🌟परभणी पंचायत समिती कर्मचार्‍यांनी जूनी पेन्शन योजना तात्काळ लागू करण्यासाठी केली निदर्शने....!


🌟पंचायत सतिमीच्या प्रांगणात कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने करीत ‘एकच मिशन जुनी पेन्शन’ अशा घोषणा दिल्या🌟

परभणी (दि.१७ मार्च) : जूनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी, या मागणीसाठी परभणी पंचायत समितीच्या संतप्त कर्मचार्‍यांनी शुक्रवारी पंचायत सतिमीच्या प्रांगणात जोरदार निदर्शने करीत रोष व्यक्त केला. ‘एकच मिशन जुनी पेन्शन’ अशा प्रकारे घोषणा दिल्या.

         यावेळी विस्तार अधिकारी (सां ) संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सय्यद सादेख, कर्मचारी युनियनचे पाराजी पंडित, शैलेंद्र पाटील, निर्मला देवराजी, पुरी महाराज, शैलेंद्र कांबळे, संतोष पाठक, ग्रामसेवक युनियनचे संतोष जाधव, तुकाराम साके, राहुल पाटील, बळीराम खटींग, पंजाबराव देशमुख, श्रीपाद पौळ, चिलगर, देशमुख, खरवने, खरात यांच्यासह महिला कर्मचारी मोठ्या संख्येने ह्या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या