🌟पुर्णेत आयोजित किर्तन सोहळ्यात प्रबोधनकार हभप.इंदुरीकर महाराजांनी दिला तरुणांना व्यसनमुक्तीचा कानमंत्र....!


🌟व्यसनाच्या आहारी गेलेल्या २५ वर्षाच्या मुलाला जन्मदाता बाप अग्नी देतोय हे दुर्दैव - हभप इंदुरिकर महाराज

पूर्णा (दि.१६ मार्च) - परभणी जिल्हा शिवसेना (उध्दव ठाकरे) गटाचे जिल्हाप्रमुख विशाल विजयकुमार कदम यांच्या अभिष्ठचिंतन सोहळ्याचे अर्थात वाढदिवसाचे औचित्य साधून काल दि.१५ मार्च २०२३ रोजी शहरातील जुना मोंढा परिसरात प्रसिध्द किर्तनकार तथा प्रबोधनकार हभप इंदुरीकर महाराज यांच्या भव्य किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते हजारोच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत प्रबोधनकार हभप.इंदुरीकर महाराज यांनी तरुणांना व्यसनमुक्तीचा कानमंत्र दिला. 


यावेळी उपस्थित जनसमुदायासह तरुणांचे प्रबोधन करतेवेळी हभप.इंदुरीकर महाराज म्हणाले की व्यसनांमुळे तरुण पिढी अक्षरशः बरबाद होत असून व्यसनाधीन झालेल्या २५ वर्षाच्या आपल्या जानजवान मुलाला जन्मदात्या बापाला अग्नी द्यावी लागतेय हे हृदयस्पर्षी दृष्य पाहायला मिळत आहे यावेळी उपस्थित तरुणांना उद्देशून ते म्हणाले की तरुणांनो व्यसनाच्या आहारी जाऊन आपले आयुष्य उध्वस्त करुन घेऊ नका.

शहरातील जुना मोंढा परिसरात शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम  (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वाढदिसा निमित्त हभप इंदुरिकर महाराज यांच्या किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन सचिन उर्फ पप्पू कदम यांनी केले होते या वेळी प्रमुख पाहुने म्हणून पुर्णा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्षसा तथा जेष्ठ नेते उत्तमराव कदम,शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम,आयोजक सचिन उर्फ पप्पू कदम यांनी थोर किर्तनकार तथा प्रबोधनकार निवृत्ती महाराज यांचा शाल श्रीफळ पुष्पहार देऊनषाजंगी सत्कार केला.


यावेळी जुना मोंढा येथील मैदानात हजारोच्या संख्येने हे भाविकांनी उपस्थिती होती यावेळी हभप.इंदुरीकर महाराज यांनी ज्ञानेश्वर माऊली यांच्या अभंगावर प्रबोधनात्मक किर्तन केले. यावेळी हरिपाठाचे महत्व सांगताना हरिपाठ हे सर्व ग्रंथाचा सार आसल्याचे त्यांनी सांगितले यावेळी विशाल कदम यांच्या अभिष्ठचिंतन सोहळा वाढदिवसा निमित्त आयोजक सचिन कदम यांनी थोर किर्तन व प्रबोधनकार हभप.इंदुरीकर महाराज यांच्या प्रबोधनात्मक किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे..... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या