🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या....!


🌟जुन्या पेन्शनसाठी नकारात्मक नाही,आर्थिक ताळेबंद पाहून निर्णय घेणार देवेंद्र फडणवीस यांची सभागृहात माहिती 🌟

✍️ मोहन चौकेकर

* संजय राऊतांचा शिव्यांचा सिलसिला सुरूच ; आता निवडणूक आयोगाला शिवी, शिवसेना निवडणूक आयोगाच्या बापाची आहे का सांगलीच्या सभेतून संजय राऊतांचा घणाघात

* शिवीचा व्हिडीओ व्हायरल झाला तर होवू दे निवडणूक आयोगाला मीच नाही संपूर्ण महाराष्ट्र शिव्या घालतो,संजय राऊतांचे उत्तर 

* विधीमंडळाविषीय भाष्य करताना काळजी घ्या  संजय राऊतांच्या चोरमंडळ वक्तव्यानंतर शरद पवारांचा महाविकास आघाडीच्या बैठकितून सल्ला 

* संजय राऊतांच्या शिव्यांचा मुद्दा आशिष शेलार यांनी सभागृहात उचलला, शिवीगाळ करुन जनतेला भडकविण्याचा केला आरोप 

* २०१९ पासून एका भटक्या कुत्र्याचा महाराष्ट्राला त्रास नितेश राणेंचा सभागृहातून संजय राऊतांवर निशाणा, तर संजय राऊत जेल किंवा पागलखान्यात गेले पाहिजेत संजय शिरसाट यांचा हल्लाबोल

* कसबा म्हणजे राज्य नव्हे पोटनिवडणूक हरणारे राज्य जिंकतात हा इतिहास, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महाविकास आघाडीला प्रत्त्युत्तर 

* आधी माझं कुटुंब, माझी जबाबदारी असं म्हणत होते आता माझा महाराष्ट्र गतीमान महाराष्ट्र अशी जाहिरात असते,अजित पवारांच्या बसवरच्या टीकेवरुन मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार 

* मनसेच्या संदीप देशपांडेवर शिवाजीपार्क येथे हल्ला, हात आणि पायाला दुखापत, उपचारानंतर डिस्चार्ज, ४ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल 

* जेसीबीतून फुले उधळल्याने कोणी नेता होत नाही, परळीतील शक्तीप्रदर्शनावरुन पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला 

* जुन्या पेन्शनसाठी नकारात्मक नाही, आर्थिक ताळेबंद पाहून निर्णय घेणार  देवेंद्र फडणवीस यांची सभागृहात माहिती 

* सुपरस्टार शाहरुख खानच्या घरात अज्ञात व्यक्तीकडून घुसखोरी; आरोपी ताब्यात

* नागपूर इथं सी-20 म्हणजेच सिव्हिल-20 इंडिया परिषदेचं २० ते २२ मार्च दरम्यान आयोजन

* सोनिया गांधींची तब्येत बिघडली दिल्लीच्या रुग्णालयात दाखल

* महाराष्ट्रात कडाक्याच्या ऊन्हात पावसाची एन्ट्री होणार, हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट

* राज्य सरकार उद्योगांबाबत श्वेतपत्रिका काढणार, उद्योगमंत्री उदय सामंतांची घोषणा

* मुंबई उच्च न्यायालयाच्या चार अतिरिक्त न्यायाधीशांची स्थायी न्यायाधीश पदी नियुक्ती 

* रश्मी शुक्ला यांना पदोन्नती,सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती

* बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे १० वीचा पेपर फुटला; पेपर फुटीची चौकशी सुरू:अमरावती विभाग बोर्डाची माहिती; दोषींवर कारवाई करावी - विद्यार्थ्यांची मागणी

* छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ जलतरण तलावाने उत्पन्नाचे विक्रम मोडले !:चालू आर्थिक वर्षात 76 लाखांचे मिळवले उत्पन्न

* लातूरमध्ये 120 वंदे भारत गाड्या जलदरित्या निर्मितीची योजना:रेल पॅनेल सदस्य शामसुंदर मानधना यांची माहिती

* मे महिन्यापर्यंत 20 हजार अंगणवाडी सेविकांची मेगा भरती; मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

* राज्यात पुढील दोन महिन्यांत 30 हजार शिक्षकांची भरती होणार, शासनाची भरतीबाबतची तयारी सुरू

* माधुरी दीक्षित, धोनीचे ओळखपत्र वापरुन लाखोंची फसवणूक, पुण्यातील फिनटेक स्टार्टअप 'वन कार्ड' कडून त्यांच्या नावाने जारी केलेली मिळवली होती क्रेडिट कार्ड

* राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या भाऊसाहेब शिंदे यांचा रौंदळ चित्रपट आजपासून सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित, नाशिकमधून अभिनेत्री नेहा सोनवणेचे पदार्पण

* भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत दारुण पराभव, भारताने ऑस्ट्रेलियाला दिले होते 76 धावांचे आव्हान

* हिमाचल प्रदेशमध्ये 15 मे 2003 पासून नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन दिली जाणार, 1 एप्रिलपासून जुनी पेन्शन लागू होणार

* सांगलीच्या बोळंकी येथे हिवराच्या झाडाच्या शेंगा खाऊन 9 मेंढ्यांचा मृत्यू, वेळेत उपचार मिळाल्याने 12 ते 15 मेंढ्या वाचल्या

* भाजप आमदाराच्या मुलाच्या घरातून 6 कोटी जप्त, कर्नाटकातील भाजप आमदार मदल विरुपक्षप्पा यांचा मुलगा प्रशांतला अटक

* राज्य शासनाच्या 10 वर्षे मुदतीच्या एकूण 2 हजार कोटींचे रोखे विक्रीस, अधिसूचना वित्त विभागाने केली जारी 

* सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या वाढली, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 3 मार्चला जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत देशांत आढळले 283 नवीन कोरोनाबाधीत रुग्ण

* राज्यात पुढील दोन महिन्यांत 30 हजार शिक्षकांची भरती होणार, शासनाची भरतीबाबतची तयारी सुरू असून लवकरच सविस्तर मिळणार

* हृदयविकाराने झटका येऊन मृत्यू होण्याचे प्रमाण कमी होण्यासाठी ‘स्टेमी’ प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार - सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत

* राज्य शासनाच्या 10 वर्षे मुदतीच्या एकूण 2 हजार कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने केली जारी, रोखे विक्री शासनाच्या अटी-शर्तींच्या अधीन राहून करण्यात येणार

* बारावी गणिताचा पेपर फुटला: गणिताचा पेपर  फुटला, बुलडाण्याच्या सिंदखेडराजामध्ये  गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल 

* गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती  प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण करणार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांची माहीती

* महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प दोन वर्षांत मार्गी लावणार, सामान्य माणसाच्या हिताच्या निर्णयांना प्राधान्य; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

* शेअर बाजार: सेन्सेक्स 899 अंकाच्या तेजीसह 59,808.97 अंकांवर स्थिरावला, तर, निफ्टी 272 अंकांच्या तेजीसह 17,594.35 अंकांवर बंद.                                     

 ✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या