🌟उज्वला योजना : गृहीनींना चुलीवर बसाव वाटेना आणि गॅस दरवाढीमुळे गॅस परवडेना...!


🌟सिलेंडरच्या दरात दिवसेंदिवस वाढ : ग्रामीण भागातील स्त्रियांना पर्यायी इंधनांचा मार्ग हाती घ्यावा लागतोय🌟



✍🏻वृत्त विशेष - बि.डी.रामपूरकर जिंतूर

देशासह राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण व्हावे  त्यांचे आरोग्य चांगले राहावे स्वयंपाक करताना लाकडी सरपण वापरल्यामुळे होणारे तीव्र दुष्परिणाम कमी करण्यासाठी सरकार ही प्रयत्न करत असून यासाठी पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने प्रधानमंत्री उज्वला योजनांचा मोठा थाटामाटात शुभारंभ केला पण या योजने अंतर्गत राज्यातील मोफत घरगुती एलपीजी गॅस योजना जरी घराघरात पोहोचली असली तरी मात्र योजना सुरू झाल्यापासून वाढत्या सिलेंडर दरामुळे नागरिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

 सिलेंडरचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहे यामुळे ग्रामीण भागातील स्त्रियांना पर्यायी इंधनांचा मार्ग हाती घ्यावा लागत असल्याचे चित्र स्पष्ट दिसते गॅसची सवय लागल्याने आताच चुलीवर स्वयंपाक करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्यामुळे तर दुसरीकडे गॅस वाढ झाल्याने गॅस ची किंमतही गगनाला भिडलेली असल्यामुळे आज गॅस 1130/- रुपये पर्यंत असून तो परवडण्यासाठी महिलांची मोठी अडचण झाली असून याबाबत नाराजीचा सूर दिसून येत आहे त्याचबरोबर घरपोच डिलिव्हरी करणाऱ्या मुलांना 20 ते 30 रुपये वेगळे घेतल्याशिवाय गॅस मिळत नाही ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल

* प्रधानमंत्री उज्वला योजना नावापुरतीच :-

पंतप्रधान उज्वला योजना ज्या महिलांना गॅस सिलेंडर मोफत मिळाले आहे त्यांनाही आता नवीन गॅस भरून घ्यायला परिस्थितीमुळे परवडत नसल्याने त्यांच्याकडेही रिकामे सिलेंडर पडून असल्याचे दिसून येते. त्या महिलांनाही नवीन सिलेंडर भरून घेण्यास मिळत नसल्याचे अनेक महिलांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या