🌟वाशिम जिल्हयात भव्य मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया व सेवा महोत्सवाचे आयोजन....!


🌟गरजु रुग्णांच्या मोफत नावनोंदणीसाठी जिल्ह्यात विविध ठिकाणे निश्चित करण्यात आली🌟

फुलचंद भगत

मंगरुळपीर - जेष्ठ समाजसेवी लॉ. वसंतराव धाडवे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सेवा महोत्सव अंतर्गत लॉयन्स आधार फाऊंडेशन परभणी, लॉ. वसंतराव धाडवे मित्रमंडळ व नंदीग्राम लॉयन्स नेत्र रुग्णालय नांदेड यांच्या पुढाकारातुन रविवार, २ एप्रिल रोजी आयुडीपी येथील सावित्रीबाई फुले नर्सिग कॉलेजमध्ये भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. गरजु रुग्णांच्या मोफत नावनोंदणीसाठी जिल्ह्यात विविध ठिकाणे निश्चित करण्यात आली असून तपासणीअंती निवड झालेल्या गरजु रुग्णांना मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रियेसह जेवण, येण्याजाण्याचा, राहण्याचा संपूर्ण खर्च, लेन्स व चष्मा पुर्णपणे मोफत राहणार आहे समाजातील काहींचा वाढदिवस साजरा करत असतांना त्यांना प्रियजनांकडून भेटवस्तु दिल्या जातात. मात्र लॉ. धाडवे आपल्या वाढदिवसानिमित्त भेटवस्तु स्विकारत नाहीत. तर यादिवशी विविध सामाजीक उपक्रम घेवून रंजल्यागांजल्यांची सेवा करतात.

  रंजल्यागांजल्यांमध्ये सदैव देव पाहणारे जेष्ठ समाजसेवी लॉ. वसंतराव धाडवे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत सेवा महोत्सवामध्ये निराधार महिलांना साडी व शिलाई मशीन वाटप, अंधव्यक्तींना काठीवाटप, दिव्यांग व्यक्तींना तीनचाकी सायकल वाटप, गरीब विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप आदी सेवाभावी कार्यक्रमासह भव्य मोफत नेत्र तपासणी शिबीर पार पडणार आहे. २ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यत स्थानिक आयुडीपी कॉलनीतील सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजमध्ये रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात येईल. नागरीकांना सोईचे जावे यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी नोंदणीची व्यवस्था करण्यात आली असून त्यामध्ये श्री साई ऑप्टीकल महालक्ष्मी पेट्रोपंपाजवळ, दत्त मेडीकल तुर्के कॉम्प्लेक्स, श्री गजानन महाराज संस्थान आयुडीपी, आंबटपुरे मंडप डेकोरेशन राजनी चौक, बबनराव इंगळे सचिव कृउबा समिती वाशिम, चितलांगे गॅस एजन्सी मंगरुळपीर, संत रोहीदास मुलांचे वसतीगृह, अनसिंग, जाजु मेडीकल शेलुबाजार या ठिकाणी नेत्रतपासणीच्या नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर मोतीबिंदु शस्त्रक्रिया महागडी असली तरी शिबीरात पुर्णपणे मोफत होणार असून ही शस्त्रक्रिया आशिया खंडातील सर्वोत्कृष्ट म्हणून गणल्या गेेलेल्या नंदीग्राम लॉयन्स नेत्र रुग्णालय नांदेड येथे केली जाणार आहे. रुग्णांनी शिबीरात येतांना आधारकार्ड सोबत आणणे आवश्यक असून निवड झालेल्यांना नांदेड येथें जाणे-येणे प्रवास, भोजन, राहणे, शस्त्रक्रिया, लेन्स व चष्मा आदी सुविधा पुर्णपणे मोफत पुरविल्या जातील. तरी जिल्हयातील गरजु रुग्णांनी या भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन लॉ. वसंतराव धाडवे मित्रमंडळाच्या वतीने यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या