🌟परभणी जिल्हा पोलिस दलाची कौतुकास्पद कामगिरी : मुलांना पळवून विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा केला पर्दाफाश....!


🌟या गुन्ह्यात एकूण १० आरोपींना घेतले ताब्यात १ विधीसंघर्ष बालक व एका महिलेस नोटीस देवून आले सोडण्यात🌟

🌟मुल पळवणाऱ्या टोळीच्या कचाट्यातून केली चार वर्षांच्या मुलाची सुटका🌟


परभणी (दि.०७ मार्च) - राज्यातील लहान मुलांना जबरदस्तीने पळवून त्या लहान मुलांची परराज्यात लाखो रुपयांच्या किमतीत विकणाऱ्या एका अंतरराज्यीय नराधम टोळीला परभणी जिल्हा पोलिस दलाने अत्यंत शिताफीने काल सोमवार दि.०६ मार्च २०२३ रोजी जेरबंद केले आहे. 

या मुल पळवणाऱ्या टोळीत प्रामुख्याने महिलांचा समावेश असलेल्या असून या टोळीकडून एका चार वर्षांच्या बालकाची देखील सुटका करण्यात आली असून याच टोळीने आतापर्यंत चार लहान मुलांना ५ ते ६ लाखात विकल्याची कबुली दिली असल्याचे परभणी जिल्ह्याच्या लेडी सिंघम कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक रागसुधा आर. यांनी पत्रकार परिषदेत दिली.   


 पोलिसांनी हैद्राबाद येथून ताब्यात घेतलेल्या ११ आरोपींमध्ये ८ आरोपी परभणी येथील रहिवासी आहेत तर अन्य मुंबई,हैद्राबादचे रहिवासी असून यात एका विधि संघर्षग्रस्त मुलाचा देखील समावेश आहे. लहान मुलं खरेदी/विक्री करण्यासाठी या टोळीचे नेटवर्क शेजारील राज्यात देखील पसरलेले होते. तर निपुत्रिक दाम्पत्याना लहान मुलं विकण्यासाठी या टोळीने महाराष्ट्रातील काही शहरांना देखील लक्ष्य केलं होतं. या टोळीला वैद्यकीय क्षेत्रातील काही मंडळी मदत करत असावी असा दाट संशय पोलिसांना असून त्या दृष्टीने तपास सुरु आहे.महिलांचा समावेश असलेली ही टोळी भुरट्या चोरांची नाही, तर ही लहान मुलांना चोरून आंध्र - तेलंगणात विकणारी अत्यंत चालाख टोळी आहे. गुप्त माहितीआधारे परभणी पोलिसांच्या पथकाने ०५ महिलांसह त्यांच्या सहा साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत.पोलीस तपासात धक्कादायक माहिती आरोपींनी दिली आहे. काही मुलांना निपुत्रिक दाम्पत्यांना विकल्याचं टोळीने कबूल केलं आहे. परराज्यातून लहान मुलांचे अपहरण करणं आणि पर राज्यात निपुत्रिक दाम्पत्यांना त्यांची विक्री करणं अशी या टोळीची कार्यपद्धती होती. ही टोळी ८० हजारापासून ०५ लाखापर्यंत पैसे उकळून मुलांची विक्री करायची.आंतरराज्य पद्धतीने कार्य करणाऱ्या या टोळीला त्या-त्या राज्यांतील काही गुन्हेगार मुलं पळवण्यासाठी मदत करत असावे असा संशय पोलिसांना आहे. तसेच या टोळीने श्रीमंत मात्र निपुत्रिक दाम्पत्याना शोधण्यासाठी मोठ्या शहरात खास नेटवर्क उभारल्याचा संशय पोलिसांना आहे.धक्कादायक बाब म्हणजे मुलं विकणारी ही टोळी गेल्या दोन वर्षांपासून सक्रिय आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आतापर्यंत अनेक मुलांची विक्री करण्यात आल्याचा संशय आहे. सध्या परभणी पोलिसांचे एक पथक सध्या परराज्यामध्ये जाऊन या प्रकरणाचा तपास करत असून या टोळीच्या इतर सदस्यांचा शोध घेत आहे.  या गुन्ह्यात एकूण १० आरोपींना ताब्यात घेतले असून १ विधीसंघर्ष बालक व एका महिलेस नोटीस देवून सोडण्यात आले आहे. आरोपीनी पो.स्टे. मंगलगीरी जिल्हा गुंटूर तसेच लातूर जिल्ह्यातील प्रत्येक एक अपहरणाच्या गुन्ह्याची देखील कबूली दिली आहे. आरोपीमध्ये नुरजहा बेगम महमद इब्राहीम शाकेर, परवीन बी  सादेक अन्सारी,  शेख समीर शेख सरवर, पडेला श्रावणी, एम. रणजीत प्रसाद, संगिता पांचोली, नामीला सुर्या मांगया, शेख चाँद पाशा शेख सैलानी, राजेंद्र नरेश रासकटला, सय्यद मजहर अली सय्यद मोहम्मद अली,  इरगा दिंडला शिल्पा यांचा समावेश आहे. ही कामगिरी  पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर., अपर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, पालमचे पो. नि.  प्रदीप काकडे, सिबर्चे पो. नि. संजय करनुर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. शिवप्रसाद मुळे, श्री. मारुती करवर, श्रीमती कल्पना राठोड, जी. टी. बाचेवाड पोउपनि श्रीमती राधीका भावसार, साईनाथ पुयड, मारुती चव्हाण, व्यंकट कुसमे, नागनाथ तुकडे तसेच पो. मु. क्यु. आर. टी,  कोतवाली, पालम, नवा मोंढा, ए एच टी युनिटचे अंमलदार, स्था.गु.शा. चे  अंमलदार, सायबर पो.स्टे. चे सर्व अंमलदार यांनी मिळून केली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या