🌟परभणीत गुरव समाजातर्फे आनंदोत्सव साजरा...!


🌟अर्थसंकल्पात गुरव समाजाच्या उन्नतीसाठी संत काशिबा महाराज विकास महामंडळ स्थापन,५० कोटी रूपयाचा निधी मंजुर🌟 


परभणी (दि.११ मार्च) :- राज्याचा अर्थसंकल्पात गुरव समाजाच्या उन्नतीसाठी संत काशिबा महाराज युवा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून ५० कोटी रूपयाचा निधी मंजुर केला. याबद्दल गुरव समाज बांधवांच्या वतीने फटाके फोडून पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

           मुख्यमुत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरव समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आ.विजयराव शिंदे यांचे अभिनंदन करण्यात आले. राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने सोलापूर येथे गुरव समाजाचे महाअधिवेशन ११ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आले होते. या अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्यासह खासदार, आमदार यांची उपस्थिती होती. या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरव समाजाच्या उन्नतीसाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा करून त्यासाठी ५० कोटी रूपयांची तरतुद सुध्दा जाहीर केली होती. त्याचीच वचनपुर्ती म्हणून राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थ संकल्पात गुरव समाजासाठी संत काशिबा महाराज युवा गुरव आर्थिक विकास महामंडळ स्थापनेची व त्यासाठी ५० कोटी रूपयाची तरतुद करून गुरव समाजाच्या विकासाचे दालन खुले केले. यामुळे परभणी जिल्हयातील गुरव समाज बांधवांनी छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळयाजवळ एकत्रीत येऊन फटाळे फोडून पेढे वाटून जल्लोष साजरा केला.

           यावेळी बालासाहेब वाघमारे, रामराव आगलावे, व्ही. एस. काळे, रमेश आगलावे, सुधाकर वाघमारे, पत्रकार राजकुमार हट्टेकर, विजय पैठणकर, सुरेश आगलावे, प्रा. डॉ. भानुदास पाटील, संदिप वाघमारे, अभिषेक पैठणकर, कैलास भालेराव, दिलीप बोरूळकर व बहुसंख्येने गुरव समाजबांधव उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे आभार श्री संत काशिबा महाराज गुरव समाज मंडळ परभणीचे अध्यक्ष अभिषेक पैठणकर यांनी मानले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या