🌟इंग्रजी हि आंतरराष्ट्रीय ज्ञान मिळवण्याची भाषा - डॉ.दुर्गेश रवंदे


🌟पुर्णेतील श्री.गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात आयोजित स्पर्धा परीक्षेतील इंग्रजी विषयाचे महत्व या विषयावर बोलतांना ते म्हणाले🌟

पुर्णा (दि.११ मार्च) येथील श्री.गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयातील "करिअर गाइडन्स अँड प्लेसमेंट सेल" विभागाच्या वतीने स्पर्धा परीक्षेतील इंग्रजी विषयाचे महत्व या विषयी डॉ.दुर्गेश रवंदे यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन विदयार्थ्यांना केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. राजकुमार, उपप्राचार्य डॉ. संजय दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती .डॉ. दुर्गेश रवंदे यांनी करियर विषयी मार्गदर्शन करताना म्हटले कि,प्रशासकीय सेवेत रूजू होण्यासाठी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना सामोरं जावं लागतं. मात्र विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी कठोर मेहनत घेण्याची तयारी ठेवावी लागते. आपण ग्रामीण भागातील असल्यामुळे विदयार्थ्यांना इंग्रजी हा विषय अवघड आहे आणि आपल्याला तो जमत नाही असा एक न्यूनगंड असतो पण अभ्यास व आत्मविश्वास जर असेल तर इंग्रजी सहज बोलता येईल व व्यक्त होता येईल.काही विदयार्थ्यांना वाटते कि फाडफाड इंग्रजी बोलणारा हुशार,जास्त शहाणा असा काहीसा गैरसमज आपण करून घेतलेला आहे.

आपली मातृभाषा मराठी ; वरून सरकारी शाळेत आपण इंग्रजी शिकलेलो त्यामुळं कुठंतरी खोलवर या भाषेविषयी एक भीती आपल्या मनात असते थोडक्यात स्पर्धा परीक्षेत इंग्रजी विषयाची गरज आणि आवश्यकता हि फार जास्त नाही. दहावी पर्यंतचा इंग्रजीचा अभ्यासक्रम आपल्याला जमला कि झालं सहज मार्क घेता येतील आपली इंग्रजी भाषेवरील पकड कशी मजबूत कराल?याच उत्तर सोप आहे. पण यामध्ये अभ्यासातील चिकाटी आणि कठोर श्रम करण्याची गरज आहे.

 जर काही महिने तुम्ही अभ्यासात सातत्य ठेवून वाटचाल केली तर नक्कीच आपला इंग्रजी विषयाचा आत्मविश्वास वाढेल आणि भीती निघून जाईल.इंग्रजी हि आंतरराष्ट्रीय ज्ञान्याची भाषा झाली आहे हे नाकारून नाही चालणार. त्यामुळे तिची भीती न बाळगता पद्धतशीरपणे आपण आपली भाषा सुधारू शकतो असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमला समन्वयक डॉ. जितेंद्र पुल्ले, डॉ. प्रकाश भांगे, डॉ. सोमनाथ गुंजकर, डॉ. ओंकार चिंचोले,प्रा शिवा कदम महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षेत्तर कर्मचारी विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला  कालिदास वैद्य व गजानन भालेराव यांनी सहकार्य केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या