🌟परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व पानी फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार.....!


🌟शेतकरी कल्याणा करिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कटिबध्द  - कुलगुरु डॉ.इंद्र मणि

परभणी (दि.३१ मार्च) : शेतकरी कल्याणाकरिता विद्यापीठ कटिबध्द असून कृषि तंत्रज्ञान प्रसार, शेतकर्‍यांचे मनोबल उंचावणे व शेतीचे उत्पन्न वाढवून शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावण्याकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व पानी फाऊंडेशन एकत्रितपणे काम करेल, असे मत कुलगुरु डॉ. इंद्र मणि यांनी व्यक्त केले.

         शेतकर्‍यांची उत्पादकता व उत्पन्न वाढीसाठी पीक उत्पादन तंत्राज्ञान प्रसाराकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व पानी फाऊंडेशन नवी दिल्ली यांच्यात दिनांक २९ मार्च रोजी सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर व पानी फाऊंडेशनचे कार्यक्रम समन्वयक नामदेव ननावारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.  पानी फाऊंडेशनच्या सामाजिक कार्यामध्ये विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सहभागी होऊन शेतीचे नवनविन तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोचविण्यासाठी मदत करतील, असे आश्‍वासन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी दिले.

          नवी दिल्ली स्थित पानी फाऊंडेशनचे संस्थापक प्रसिध्द सिनेअभिनेते आमिर खान व श्रीमती किरणराव असून पानी फाऊंडेशनच्या वतीने ग्रामीण भागातील पाणी पातळीत वाढ करणे तसेच उत्पादन खर्चात बचत करून उत्पादकता व उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने राज्यामध्ये ‘सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा’ सन २०२३ हंगामाध्ये राज्यातील ३९ तालुक्यातील सर्व गावांमध्ये घेण्यात येत आहे. या स्पर्धेअंतर्गत शेतकरी गटांना विविध पीकांचे लागवड व संरक्षण तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे, दृकश्राव्य प्रशिक्षण साहित्य निर्मीती करणे आणि डिजीटल शेतीशाळेमध्ये शेतकक्षययांना मार्गदर्शन करणे आदी कार्य केले जाते. सदर करारामुळे विद्यापीठ शास्त्रज्ञ व पानी फाऊंडेशन संयुक्तपणे कृषि तंत्रज्ञान प्रसार कार्य करणार आहेत. या करारावर डॉ. दत्तप्रसाद वासकर आणि नामदेव ननावारे यांनी स्वाक्षरी केली.

           पानी फाऊंडेशनच्या वतीने मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामामध्ये फार्मर कप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विद्यापीठ शास्त्रज्ञ तंत्राज्ञान प्रसारासाठी डिजीटल शेतीशाळेमध्ये शेतकर्‍यांना आवश्यक ते मार्गदर्शन करण्यासाठी सहभागी झाले होते. यामुळे शेतकर्‍यांच्या पीक लागवड खर्चात बचत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या