🌟परभणी जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार मदन (बापू) कोल्हे 'जीवनगौरव पुरस्काराने' सन्मानित...!


🌟जीवन गौरव पुरस्कार पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मदन (बापू) कोल्हे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे🌟

परभणी (दि.२७ मार्च) - सामाजिक बांधिलकी पत्करून जनसेवा करण्याचे , गेल्या पाच दशकापासून हाती घेतलेले व्रत अविरतपणे सायकलवर भ्रमण करत,पार पाडत असलेले येथील जेष्ठ पत्रकार मदन (बापू) कोल्हे यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल नुकतेच " जीवन गौरव " पुरस्काराने सन्मानित केले आहे .

भगीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने भाऊसाहेब वर्तक सभागृह विरार तालुका वसई जिल्हा पालघर येथे दिनांक 19 मार्च 2023 रोजी झालेल्या संत रोहिदास महाराज यांची 645 वी जयंती व मान्यवरांच्या सन्मान सोहळ्यामध्ये राज्यभरातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या मान्यवरांना आमंत्रित करून सन्मानित केले, यावेळी भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान चे संस्थापक/अध्यक्ष दिनेश अरुण भोईर यांनी, सामाजिक व पत्रकारीता क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल , परभणीतील जेष्ठ पत्रकार , इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन नवी दिल्लीचे परभणी जिल्हा अध्यक्ष मदन (बापू )कोल्हे ,संपादक धर्मभूमी यांना " जीवन गौरव "पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

 ' माणुसकी' जपत ,सायकलवर फिरत मदन (बापू ) कोल्हे यांनी विद्यार्थी संघटना ,कामगार संघटना ,पत्रकारांच्या संघटना यामध्ये वयाची पंचाहत्तरी ओलांडत संपूर्ण हयात सेवाभावी वृत्तीने घालवली आहे. यापूर्वी त्यांना विविध मान्यवर संस्था ,संघटना कडून गौरविलेले असून त्यांना ,' डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण ' पुरस्कार व मानपत्र , मूकनायक पुरस्कार , महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ परभणी जिल्हा शाखेच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार व मानपत्र,समता पुरस्कार ,इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन नवी दिल्लीचा 'एक्सलंट अवार्ड 2020' उत्कृष्ट संपादक,आदी मान्यवर मान्यवरांकडून नामवंत पुरस्कार प्राप्त झालेले आहेत तसेच  ठिकठिकाणी त्यांचे सत्कार करून गौरविलेले आहे .

वरील जीवन गौरव पुरस्कार पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मदन ( बापू )कोल्हे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या