🌟पुर्णेतील तळीरामांच्या अतिरेकी धुमाकूळाला लगाम लावणार तरी कोण ? दारुबंदी विभागासह प्रशासन कुंभकर्नी झोपेत...!


🌟शहरातील सार्वजनिक सन महोत्सवासह व्यापारपेठेतही अर्वाच्च भाषेचा वापर करीत तळीरामांचा धुमाकूळ🌟


🌟व्यापारी प्रतिष्ठितांसह परिसरातील रहिवासी महिला देखील तळीरामांच्या अर्वाच्च भाषा व अश्लील शिविगाळेला त्रस्त🌟

✍🏻परखड सत्य : चौधरी दिनेश (रणजीत)

पुर्णा (दि.०९ मार्च) - 'पुर्णा गाव तस भलतच चांगल पण पडद्या मागील राजकीय दहशतवाद्यांच्या इशाऱ्यावर नग्न तांडव घालणाऱ्या नशेडी तळीरामांनी अक्षरशः अती संवेदनाशीलतेचा कलंक लावून वेशीला टांगल' अशी अवस्था एकंदर पुर्णा शहरासह संपूर्ण तालुक्यात झाल्याचे निदर्शनास येत असून शहरात साजरे होणारे सन उत्सवासह सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये यथेच्छ दारु ढोसून धुमाकूळ घालण्याचे गंभीरप्रकार सर्रास होत असल्यामुळे सातत्याने कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्यामुळे  पोलिस प्रशासनासह सर्वसामान्य जनता व्यापारी वर्गासाठी डोकेदुखी निर्माण होत असतांना या नशेडी तळीरामांपुढे प्रशासन देखील अक्षरशः हतबल झाल्याचे पाहावयास मिळत आहे.पुर्णा शहरातील मुख्य बाजारपेठेसह उच्चभ्रू वसाहत असलेल्या लोकमान्य टिळकरोड,महावीर नगर सह शहराला जोडणाऱ्या बसस्थानक रोड,शास्त्री नगर परिसरात देखील देशी/विदेशी दारुची दुकान असल्यामुळे या दारु दुकानांतून मनसोक्त दारु ढोसून अक्षरशः सैराट झालेले तळीराम परिसरासह प्रमुख मार्गांवर सातत्याने अत्यंत अर्वाच्य भाषेचा वापर करीत येणाऱ्या/जाणाऱ्यासह परिसरातील व्यापारी सर्वसामान्य नागरिकांना देखील शिवीगाळ करीत वर्षाच्या बाराही महिने शिमगा साजरा करीत असल्यामुळे परासरातील नागरीक/महालांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून परिसरातील प्रत्येक व्यापाऱ्यांकडून दावसभर दहा/विस/पन्नास रुपयांची जबरी वसूली करुन हे नशेडी तळीराम व्यापाऱ्यांचीच माय-बहिन एक करीत असतांना शहरातील सिसीटिव्हीत कैद होत असतांना देखील त्यांच्याकडे पोलिस प्रशासन का दुर्लक्ष करीत आहे ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित होत आहे.

पुर्णा शहरासह संपूर्ण तालुक्यात यथेच्छ दारु ढोसणाऱ्या  नशेडी तळीरामांचा अक्षरशः नग्न तांडव करीत मुक्त सच्चार होत असतांना एकीकडे सर्वसामान्य जनता नागरिक व्यापारी पादचारी महिलांसह प्रतिष्ठित नागरिक त्रस्त झाले असतांना मात्र परभणी जिल्हा दारुबंदी विभागातील अधिकारी/कर्मचाऱ्यांना आपल्या कर्तव्याचा विसर पडल्यामुळे या अकार्यक्षम अधिकारी/कर्मचाऱ्यांमुळे नशेडी तळीरामांना   शहरासह तालुक्यात सर्वत्र अधिकृत देशी/विदेशी दारु विक्रेत्यांसह अवैध देशी/विदेशी दारु विक्रेत्यांकडून चोवीस तास मद्य सेवा पुरवली जात असल्यामूळे सर्वत्र 'झुम बराबर झुम शराबी' असा कारभार सर्वत्र झाल्याचे निदर्शनास येत आहे.


पुर्णा शहरातील शांतता व सुव्यस्थेला ज्या ज्या वेळी गालबोट लागले त्या प्रत्येक घटनांचा सखोल अभ्यास केल्यास एक गोषौट निश्चितच लक्षात येते की या घटनांना सर्वस्वी नशेडी तळीरामच कारणीभूत आहेत सार्वजनिक सन महोत्सव असो की धार्मिक कार्यक्रम या कार्यक्रमांना गालबोट लावण्यास नशेडी तळीराम जवाबदार असले तरी पडद्या मागून त्यांना मद्याची रसद पुरवून शांतता व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न चिन्ह निर्माण करणारे मात्र पडद्या मागील तत्वभ्रष्ट राजकीय दहशतवादीच असतात परंतु घटने नंतर मात्र साळसुदपणाचा आव आणून 'तो मी नव्हेच' या भुमिकेत वावरत आपण किती शांतताप्रिय आहोत याचा आभास ही सोईस्कररित्या निर्माण करतात त्यामुळे या नशेडी तळीरामांसह त्या पडद्या मागील तळीराम समर्थकांची देखील एकवेळ प्रशासनाला तळी उचलावीच लागणार आहे त्यानंतरच शहरासह तालुक्यात खऱ्या अर्थाने शांतता व सुव्यवस्था कायम राहण्यास सुरुवात होईल....

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या