🌟गुढी पाडव्यापासून सुरू होणार क्रिकेटचा थरार : आमदार चषक - २०२३ चे होणार उद्घाटन.....!


🌟विदर्भातील सर्वात भव्य डे-नाईट टेनिस बाँल क्रिकेट स्पर्धेचे चिखलीत आयोजन🌟

चिखली : जनमानसात सर्वाधिक लोकप्रिय खेळ असलेल्या क्रिकेटच्या विदर्भातील सर्वात मोठ्या स्पर्धेला दि. २२ मार्च रोजी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर थाटात सुरुवात होत आहे. आ. श्वेताताई महाले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  शिवराजदादा पाटील मित्र मंडळाद्वारे आयोजित या 'आमदार चषक - २०२३ ' मध्ये  डे - नाईट टेनिस बॉल क्रिकेटचे खुले सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेनिमित्ताने देशातील मातब्बर खेळाडू चिखलीत हजेरी लावणार असून  सोबतच बक्षिसांची जंगी लूट सुध्दा होत आहे. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष  आ. अँड. आकाश फुंडकर  यांच्या हस्ते व चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धेचे उद्घाटन दुपारी ३ : ३० वाजता तालुका क्रीडा संकुलाच्या प्रांगणावर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. 

            आमदार चषक - २०२३ च्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ॲड विजय कोठारी प्रदेश कार्यकारणी सदस्य, रामकृष्णदादा शेटे, अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ, ह भ प प्रकाश महाराज जवंजाळ, विश्वस्त विठ्ठल रुक्मिणी संस्थान, डॉ प्रतापसिंग राजपूत जिल्हा उपाध्यक्ष भाजप, प्रेमराज भाला सचिव शिक्षण प्रसारक मंडळ,सुरेशप्पा खबूतरे जेष्ठ नेते,  ॲड मंगेश व्यवहारे जेष्ठ नेते, रामदासभाऊ देव्हडे जेष्ठ नेते, ऋषिकेश जाधव जिल्हा प्रमुख युवा सेना, संदिप शेळके अध्यक्ष शाहू परिवार, शिवाजीराव  देशमुख उपजिल्हा प्रमूख शिवसेना, सुहास शेटे  माजी नगराध्यक्ष,शेख अनिश शेख बुढन जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्यांक आघाडी पंडितराव देशमुख शहराध्यक्ष भाजप, डॉ कृष्णकुमार सपकाळ तालुका अध्यक्ष भाजप, ॲड सुनील देशमुख तालुका अध्यक्ष भाजप, गजानन मोरे तालुका प्रमुख शिवसेना, पंजाबराव धनवे जिल्हा सरचिटणीस युवा मोर्चा विलास घोलप शिवसेना शहर प्रमुख, सागर पुरोहित शहराध्यक्ष युवा मोर्चा, संतोष काळे तालुका अध्यक्ष युवा मोर्चा, गोपीनाथ लहाने तालुका प्रमुख युवा सेना हे मान्यवर  उपस्थित राहणार आहेत.

* उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन आणि प्रेक्षकांचा लाभणार प्रतिसाद :-

चिखली शहरासह बुलढाणा जिल्हा व जिल्ह्याबाहेरील तसेच भारतातील  दिग्गज संघांचा सहभाग असलेल्या या क्रिकेट स्पर्धेत अनेक युवा तसेच अनुभवी  खेळाडू आपल्या क्रीडा नैपुण्याचे प्रदर्शन करणार आहेत. दिवस - रात्र चालणाऱ्या या टेनिस बाँल स्पर्धेतून चिखलीकर क्रिकेट शौकीनांना उत्कृष्ट खेळाचा आनंद अनुभवायला मिळेल. या भव्य स्पर्धेसाठी तालुका क्रीडा संकुलामध्ये जय्यत तयारी करण्यात आली असून युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक क्रिकेट  खेळाडूंना नवनव्या खेळाडूंचे कौशल्य पहायची दुर्मिळ संधी या स्पर्धेच्या निमित्ताने मिळणार असून स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना चिखलीतील क्रिकेट शौकीनांचे प्रेम व प्रतिसाद अनुभवायला मिळणार आहे.

*आकर्षक बक्षिसांची होणार लयलूट :-

विदर्भातील सर्वात भव्य डे - नाईट टेनिस बाँल  क्रिकेट स्पर्धा ठरणार्या या आ. चषक - २०२३ मध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना व विजेत्या आणि उपविजेत्या संघांना आकर्षक बक्षिसे आयोजकांच्या वतीने देण्यात येत आहेत. यामध्ये अंतिम सामन्यातील विजेत्या संघाला ३ लाख ३३, ३३३ रुपयांचे प्रथम बक्षीस, उपविजेत्या संघाला २ लाख २२, २२२ रुपयांचे बक्षीस तर मालिकावीर ठरणार्या खेळाडूला ३१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक सामन्यातील सामनावीर खेळाईला २१०० रुपये रोख बक्षीस आणि उत्कृष्ट फलंदाज व उत्कृष्ट गोलंदाजांना प्रत्येकी ११ हजार रुपयांची रोख बक्षिसे वितरीत केली जाणार आहेत....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या