🌟परभणी जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनासह राज्य उत्पादन शुल्क विभाग अदृश्य ?


🌟जिल्ह्यात भेसळयुक्त खाद्य पदार्थांसह खुलेआम अवैध देशी/विदेशी दारु विक्रीचे सर्वत्र दिसतेय भयावह दृष्य🌟

 🌟भेसळयुक्त दुध/तुप खाद्यतेल आदींसह विविध भेसळयुक्त खाद्य पदार्थांची सर्रास विक्री🌟

✍🏻वृत्त विशेष - चौधरी दिनेश (रणजीत)

परभणी (दि.२१ मार्च) - परभणी जिल्ह्यात सर्वत्र भेसळयुक्त पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याचे निदर्शनास येत असून खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी ठरवून दिलेल्या मनमानी दराप्रमाणे पैसे देऊन देखील नागरिकांना भेसळयुक्त खाद्य पदार्थांची विक्री केली जात असल्यामुळे जिल्ह्यात अन्न व औषधी प्रशासनाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होतांना दिसत असून अन्न व औषधी प्रशासना प्रमाणेच जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्तव्यावर देखील प्रश्न उपस्थित होतांना पाहावयास मिळत आहे.

परभणी जिल्ह्यात पुर्णा,पालम,गंगाखेड,सेलू,मानवत,जिंतूर,सोनपेठ या सात तालुक्यांचा समावेश असून जिल्ह्यातील सातही तालुक्यात भेसळयुक्त खाद्य पदार्थ ज्यात दुध,दही,तुप,खुले खाद्य तेलासह बेकायदेशीररित्या पाकीटबंद केलेले भेसळयुक्त गोडतेल,मिरची,हळद पावडर मसाले,बेसनपीठ,गहू/ज्वारी/बाजरी पिठ आदीसह विविध भेसळयुक्त खाद्य पदार्थ संबंधित विक्रेत्यांनी ठरवून दिलेल्या मनमानी दराने खरेदी करून देखील नागरिकांना निकृष्ट दर्जाचे व भेसळयुक्त खाद्य पदार्थ विक्री केले जात असल्यामुळे नागरिकांना आरोग्यावर याचे भयंकर परिणाम होत असून जिल्ह्यात अनेक तालुक्यात काही कायदेशीर तर काही बेकायदेशीर दुध विक्री केंद्र चालत असून या दुध विक्री केंद्रांवर दुधाला प्रती लिटर ७० रुपयें प्रमाणे भाव देऊन देखील दुध ग्राहकांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे व भेसळयुक्त दुध विक्री केले जात असून या दुधाची अक्षरशः दुर्गंधी येत असल्यामुळे संबंधित दुध विक्रेते या दुधात नेमका कोणते पदार्थ/केमिकल मिसळत आहे याकडे लक्ष द्यायलाच कोणी तयार नाही अशीच अवस्था तुप विक्रेत्यांची देखील झाली असून गावरान तुपाची विक्री करणारे तुप विक्रेते प्रती किलो आठशें रुपयें दराने तुप विक्री करीत असून तेही भेसळयुक्त त्यामुळे या भेसळयुक्त दुध/दही/तुपासह विविध खाद्य पदार्थांचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.

परभणी जिल्ह्यात सर्वत्र भेसळयुक्त खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे निदर्शनास येत असतांना परभणी जिल्हा अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी श्री.सरकटे यांच्या कार्य तत्परतेवर गंभीर प्रश्न निर्माण होत असून भेसळयुक्त खाद्य विक्रेत्यांना जिल्हा अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी/कर्मचारी आर्थिक हितसंबंध जोपासत पाठबळ तर देत नाहीत ना ? असा प्रश्न जनसामांन्यात उपस्थित होत आहे शासनाने खुल्या गीडतेल विक्रीवर बंदी घातलेली असतांना देखील जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अक्षरशः टँकरने खुले तेल असून या भेसळयुक्त तेलाची काही दुकानदार पाकीट बनवून तर काही दुकानदार खुल्या स्वरुपात मनमानी दराने विक्री करतांना पाहावयास मिळत आहे.


🌟परभणी जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागही अदृश्य :-


परभणी जिल्हा अन्न व औषधी प्रशासनासह परभणी जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्य तत्परतेवर जिल्ह्यात सातत्याने प्रश्न चिन्ह निर्माण होत असून जिल्ह्यातील पुर्णा,पालम,गंगाखेड,सेलू,मानवत,जिंतूर,सोनपेठ या सातही तालुक्यात सर्वत्र खानावळीच्या नावावर चालणाऱ्या धाब्यांसह शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध देशी/विदेशी दारुसह भेसळयुक्त बनावटी दारुची खुलेआम विक्री होत असतांना जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क अधिकारी रवी किरण कोल्हे,निरिक्षक सुशिल चव्हाण,निरिक्षक गणेश कुफे,शेख अश्रफोद्दीन,आलाट,भरारी पथकातील पुसे,मंडलवार हे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येत असून त्यांच्या अकार्यक्षम कारभारामुळे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यरत आहे की नाही ? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.......


   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या