🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - चोवीस तासातील महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या....!


🌟फडणवीसांच्या घरासमोर बॉम्ब ? काल रात्री दोन वाजता नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रूमला धमकीचा फोन ; आरोपीला अटक🌟

 ✍️ मोहन चौकेकर

* अत्यावश्यक औषधांच्या किंमती 1 एप्रिल 2023 पासून वाढणार, साधारणपणे 12 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता 

* गुणरत्न सदावर्तेंना  धक्का : महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलने दोन वर्षांसाठी रद्द केली वकिलीची सनद

* कर्जदाराचे बँक खाते फ्रॉड घोषित करण्यापूर्वी त्याची बाजू ऐकून घ्या, सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण याचिकेच्या सुनावणीत दिला निर्णय

* फडणवीसांच्या घरासमोर बॉम्ब ? काल रात्री दोन वाजता नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रूमला धमकीचा फोन ; आरोपीला अटक

* कार निर्माता कंपनी BMW यावर्षी भारतात 19 कार मॉडेल लाँच करणार, इलेक्ट्रिक कारचाही समावेश करण्यात येणार

* शरद पवारांच्या मध्यस्थीने सावरकर प्रश्नांवरून महाविकास आघाडीत होणारी फुट टळली

* जपानमधील होक्काइडो येथे भूकंपाचे जोरदार धक्के, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची तीव्रता होती 6.1 रिश्टर स्केल

* Kia सेल्टोस या कारपेक्षा Kia सोनेट या कारच्या विक्रीत मोठी वाढ, फेब्रुवारी महिन्यात या कारच्या 9,836 युनिट्सची विक्री

* वृत्तपत्रात जोडीदारावर आरोप लावणे बदनामीकारक असो वा नसो परंतु प्रतिष्ठा कमी करणारे असते - मुंबई उच्च न्यायालय

* राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात भाजप काढणार सावरकर गौरव यात्रा- चंद्रशेखर बावनकुळे

* संपामुळे जर्मनीत रेल्वे, विमाने, सार्वजनिक वाहतूक सेवा ठप्प

* नागरिकांना दिलासा! आधार-पॅन कार्ड लिंक करण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ

* दिल्ली उच्च न्यायालय कडून संजय राऊत, उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंना समन्स, 17 एप्रिल रोजी सुनावणीसाठी हजर राहण्याचे दिले आदेश

* भारत सरकारला चिनी कंपन्यांकडून प्राप्त झालेले 54 प्रस्ताव प्रलंबीत- निर्मला सीतारामन

* राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ व विद्यमान मंत्री शंभुराजे देसाई यांना कोरोनाची लागण

* मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल 1 एप्रिलपासून महागणार, चारचाकी वाहनांना 270 ऐवजी 320 रुपये द्यावे लागणार

* रत्नागिरी जिल्ह्यातील 19 शाळांना आदर्श शाळा पुरस्कार जाहीर

* कलासंस्कृतीचे दर्शन:पुण्यात 'वितस्था महोत्सवाचे आयोजन, 31 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान काश्मिरची कलासंस्कृती पाहण्याची संंधी

* अदानी समुहाची आणखी एक खरेदी!अदानी उद्योग समुहाच्या AMG मिडिया नेटवर्कने क्विंट क्विंटिलियन बिझनेस मीडियाचे 49 टक्के शेअर्स केले खरेदी,47.86 कोटी रुपयांमध्ये झाला करार

* शेअर बाजार: सेन्सेक्स 50 अंकांच्या घसरणीसह 57,613.72 वर बंद, तर निफ्टी 34 अंकांच्या घसरणीसह  वर 16,951.70 बंद

* सोनेट कारच्या विक्रीत 60 टक्क्यांची वाढ: Kia सेल्टोस या कारपेक्षा Kia सोनेट या कारच्या विक्रीत मोठी वाढ, फेब्रुवारी महिन्यात या कारच्या 9,836 युनिट्सची विक्री

* उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंगचा अजब निर्णय: किम जोंग उनने हेसन शहरात अचानक लागू केला लॉकडाऊन, या शहरातून परतलेल्या सैनिकांच्या 653 बुलेट्स गायब झाल्याने बुलेट्स मिळेपर्यंत निर्बंध लागू असणार 

* सोन्याचे आजचे दर: मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचे प्रती 10 ग्रॅमसाठीचे दर  59450 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचे प्रती 10 ग्रॅमसाठीचे दर 54500 रुपये

* सुषमा अंधारेंच्या तक्रारीची महिला आयोगाने घेतली दखल, पोलीस आयुक्तांना दिले कारवाई करण्याचे निर्देश

* जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणीसाठी ‘आयएफसी’ सोबतचा भागिदारी करार उपयुक्त ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस

* एक ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याच्या राज्याच्या उद्दिष्टाला गती मिळणार

* महिला सक्षमीकरणासाठी त्यांचे हक्क, प्रतिनिधीत्व, विकासाची संसाधने उपलब्ध होणे गरजेचे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

* छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराचे वितरण 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या