🌟परभणी जिल्ह्यातील ७८ खत बि-बियाणे विक्रेत्यांची केली विशेष पथकाने....!


🌟आठ खत विक्रेत्यांचे परवाने पथकाने केले निलंबित : गुजरातच्या बनावट खत निर्मिती कंपनीचा परवाना निलंबित🌟


🌟बनावट खत विक्री करणार्‍या कंपन्यांनी कृषि विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या संगनमताने केला गैरप्रकार🌟

परभणी (दि.१६ मार्च) : परभणी जिल्ह्यातील ७८ खत बि-बियाणे विक्रेत्यांची तपासणी विशेष पथकाने केली या तपासणीतून दोषी आढळलेल्या ०८ खत विक्री केंद्रांचे परवाने पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. 

गुजरात राज्यातील भावनगर येथील मे.पृथ्वी खेतीवाडी केंद्र या कंपनीचा खत विक्रीचा परवानाही १५ मार्च २०२२ पासून निलंबित करण्यात आला असल्याचे राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी एका तारांकित प्रश्‍नाद्वारे परभणी जिल्ह्यातील बनावट खत विक्री प्रकरणात सभागृहाचे लक्ष वेधले. भावनगरच्या कंपनीविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यात कृषी दुकानदारांकडून ई-पॉश मशीनचा वापर न करता खताची विक्री केली जात आहे. भावफलके नाहीत. जानेवारी २०२३ मध्ये शेतकर्‍यांना या गोष्टी निदर्शनास आल्या. विशेषतः बनावट खत विक्री करणार्‍या कंपन्यांनी कृषि विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या संगनमताने गैरप्रकार केला, असा आरोप करीत सरकारने खुलासा करावा, अशी मागणी केली. यास उत्तर देतेवेळी सत्तार यांनी वरील माहिती दिली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या