🌟परभणी जिल्ह्यातल्या पुर्णा तालुक्यातील पांगरा रोडवर पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाने पकडला १४ बॅग अवैध गुटखा....!


🌟विशेष पोलिस पथकाने केलेल्या कारवाईत कारसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त🌟 

परभणी (दि.२१ मार्च) - परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातल्या पुर्णा-पागरा रोडवर आज मंगळवार दि.२१ मार्च २०२३ रोजी दुपारी १२-०० वाजेच्या सुमारास जिल्हा पोलिस अधिक्षक आर.रागसुधा यांच्या विशेष पोलिस पथकाने धाडसी कारवाई करीत एका कारसह अंदाजे चार लाखाचा मुद्देमाल जप्त केला यावेळी कारमध्ये १४ गोनी प्रतिबंधित मानवी आरोग्यास घातक असलेला विषारी गुटखा आढळून आला. 

परभणी जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातील शहरांसह गाव खेड्यात सर्वत्र सार्वजनिक ठिकाणी शाळा/महाविद्याल तसेच शासकीय कार्यालयांच्या परिसरात प्रतिबंधीत मानवी शरीरास घातक असलेल्या अवैध विषारी गुटख्याची खुलेआम विक्री होत असतांना परभणी जिल्हा अन्न व औषधी प्रशासनातील अकार्यक्षम अधिकारी/कर्मचारी धृतराष्ट्रा प्रमाणे अंधत्व स्विकारून अवैध गुटखा तस्करांनी कोणते बंधुत्व निभावत आहेत ? असा प्रश्न उपस्थित होत असतांनाच आज मंगळवार दि.२१ मार्च रोजी पुर्णा तालुक्यातील पुर्णा-पागरा रस्त्यावर परभणी जिल्हा पोलिस अधिक्षक आर.रागसुधा यांच्या विशेष पोलिस पथकाने सापडा रचून एक कार क्रमांक एम.एच.०२ सि.पी.६७५६ ही काळ्या रंगाची महागडी कार ताब्यात घेऊन त्या कारची तपासणी केली असता सदरील कार मध्ये शासनाने बंदी घातलेल्या प्रतिबंधीत अवैध गुटख्याच्या १४ बॅगा आढळून आल्या असून त्यातील गुटख्याची किंमत अंदाजे ५० हजार रूपयें असल्याचे समजते यावेळी विशेष पोलिस पथकाने पंचनामा करून कारसह अंदाजे चार लाखांचा मुद्देमाल जप्त करुन पुढील कारवाई साठी पुर्णा पोलिस प्रशासनाच्या स्वाधिन केला असून या प्रकरणी पूर्णा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी इस्माईल शेख राहणार धनगर टाकळी तालुका पुर्णा या आरोपीस ताब्यात घेतले आहे.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या