🌟जिंतूर तालुक्यातील बोरी येथे दोन गटातील वादावरून परस्पर गुन्हे दाखल...!


🌟घटनेतील एकूण 23 आरोपींवर गुन्हे दाखल🌟

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

धुलीवंदनाच्या सायंकाळी किरकोळ कारणावरून बोरी येथे दोन गटांमध्ये वाद होऊन परस्परविरोधी च्या फिर्यादीवरून बोरी पोलीस स्टेशन मध्ये वार मंगळवार 23 जनावर गुन्हा दाखल करण्यात आले.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की येथील माळी गल्ली मध्ये रहिवासी विशाल प्रसादराव घोलप यांच्या फिर्यादीवरून साक्षीदार महिलेस शिवगाळ का केली अशी विचारणा करत असताना बारा जणांनी संगमात करून साक्षीदारांनी फिर्यादीस लाठी काठी दगड व कोयता मारहाण महारण  करुन शिवागाळ केली  जखमी केली . म्हणून बारा जना विरूद्ध गुन्हा दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 41 / 2023 भादवि कलम 324, 323, 504 ,143, 147 148, 149 भादवी तर घरासमोर उभी असलेल्या महिलेचा हात धरून ओढले व जातिवाचक शिवगाळ करून थापड बुक्क्यांनी महाराणा केल्याप्रकरणी 11 जणाविरुद्ध गुन्हा दाखल फिर्यादी उषा सुधाकर कनकुटे वय 50 वर्षे यांच्या फिर्यादीवरून विनयभंग व ॲट्रॉसिटी गुना 11 विरुद्ध दाखल करण्यात आला आहे .

तसेच  गुन्हा रजिस्टर नंबर 42/ 2023 कलम 323, 324, 504 ,143 ,147 ,148 ,354 व ॲट्रॉसिटी या कलमावरून वरील 11 जणांवर बोरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला घटनेचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी श्री गोफने हे करीत आहेत. मंगळवारी  उशिरापर्यंत बोरी पोलीस ठाण्यामध्ये शेकडोंचा जमा उपस्थित होता त्या जमावस पांगवण्याकरता पोलीस प्रशासनाच्या वतीने राज्य राखीव दल तसेच पोलीस प्रशासनाने बंदोबस्त ठेवला होता या घटनेच्या निषेधार्थ बोरी येथील व्यापाऱ्यांनी आपले स्वयंपूर्ण प्रतिष्ठान बंद ठेवून या घटनेचा निषेध ठेवण्यात आला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या