🌟छ.संभाजी नगर येथील महाविकास आघाडीची सभा ऐतिहासिकच होणार - विनोद घोसाळकर


🌟महाविकास आघाडीच्या सभेच्या निमित्ताने चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांचे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन🌟

✍️ मोहन चौकेकर 

छ.संभाजीनगर (दि.३१ मार्च) महाविकास आघाडीची २ एप्रिल रोजी होणारी जाहीर सभा ऐतिहासिकच होणार आहे. पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी सभेसाठी अत्यंत चांगले नियोजन केले आहे. वाहतूक व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था देखील योग्य पद्धतीने होणार आहे. सभेच्या ठिकाणी शिवसैनिकांनी शिस्तीचे पालन करून सर्वसामान्य नागरिकांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घ्यावी, अशी सूचना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी केली.

 संभाजीनगर येथे २ एप्रिल रोजी जाहीर सभा होणार आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणाऱ्या सभेची जय्यत तयारी सुरू असून शिवसैनिक व पदाधिकारी घरोघरी जाऊन नागरिकांना सभेला येण्याचे निमंत्रण देत आहेत. सभेच्या पूर्वतयारीनिमित्त आज शुक्रवारी सभेच्या ठिकाणी संस्कृतीक मंडळ मैदानावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख तथा म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपशहरप्रमुख, लोकप्रतिनिधी व मुख्य पदाधिकाNयांची आढावा बैठक घेतली. या बैठकीस मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी राजू राठोड, माजी महापौर नंदकुमार घोडेले उपजिल्हाप्रमुख बंडू ओक, बप्पा दळवी, अनिल पोलकर, विनायक पांडे, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, ज्ञानेश्वर डांगे, विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी, तालुकाप्रमुख बाळू गायकवाड, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक प्रतिभा जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती.

२ एप्रिल रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. सर्वसामान्य नागरिक या सभेला मोठ्या संख्येने येणार असून शांतता आणि शिस्तीत महाविकास आघाडीची सभा पार पडेल, असा विश्वास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला.या बैठकीस मार्गदर्शन करताना संभाजीनगर शहरात ही जाहीर सभा होत असल्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याकडून सभेचे योग्यरीतीने नियोजन केले जात आहे. घराघरांत जाऊन नागरिकांना सभेचे निमंत्रण देण्यात यावे, वॉर्डावॉर्डांत आणि चौकाचौकांत भगवे ध्वज लावून बॅनर, पोस्टर्स लावावेत. संपूर्ण शहर भगवेमय झाले पाहिजे. सभेसाठी येणाऱ्या नागरिकांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी. शिवसैनिकांच्या शिस्तीचे दर्शन सभेच्या ठिकाणी दिसले पाहिजे. कोणतीही अडचण असल्यास वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले.

महिला आघाडीने देखील सभेसाठी वॉर्डावॉर्डांत बैठका घेऊन महिलांना सभेला येण्याचे निमंत्रण दिले.या बैठकीस  उपशहरप्रमुख संजय बारवाल , हिरा सलामपुरे, कृष्णा मेटे, सुगंधकुमार गडवे, किशोर कच्छवाह, अनिल जैस्वाल बापू पवार, संतोष खेंडके, प्रमोद ठेंगडे, संजय हरणे, दिग्विजय शेरखाने, चंद्रकांत इंगळे, शिवा लुंगारे, राजेंद्र दानवे, जयसिंग होलीये, वसंत शर्मा, अनिल जयस्वाल,चंद्रकांत इंगळे, संदेश कवडे, प्रा. संतोष बोर्डे, राजू वाकोडे, लक्ष्मण बखारिया, लक्ष्मण पिवळ, माजी नगरसेवक मोहन मेघावाले, सुभाष शेजवळ, सिताराम सुरे, बंटी जयस्वाल, सुधीर घाडगे, नंदू लबडे महिला आघाडीच्या सह संपर्क संघटक सुनीता देव ,समन्वयक कला ओझा, उपजिल्हा संघटक अनिता मंत्री, जयश्री लुंगारे, नलिनी बाहेती, दुर्गा भाटी, शहर संघटक विद्या अग्निहोत्री, आशा दातार भागवत आक्का शिरसाठ विधानसभा संघटक मीरा देशपांडे, मंजुषा नागरे सुनंदा खरात कविता सुरळे राजश्री राणा सविता निगळे रेणुका जोशी किरण शर्मा सीमा गवळी मीना यादव पद्मा तुपे प्रेम लता चंदन रेखा शहा बबीता गायकवाड भारतीय वराळे मीना खोतकर नीता शेळके आरती साळुंखे संभाजी ब्रिगेडच्या रेखा वाहूटळे आदींची उपस्थिती होती......

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या