🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/बातम्या....!


🌟राज्याच्या सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी आता १४ मार्च रोजी होणार🌟

 ✍️ मोहन चौकेकर

* मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी समिती स्थापन करण्याचे आदेश; समितीत पंतप्रधान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते, सरन्यायाधीश यांचा समावेश केला जाणार.

* कसब्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर 11 हजार 40 मतांनी विजयी, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगता 36070 मतांनी विजयी.

* हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी चार आरोपींपैकी एक आरोपी दोषी तर तिघांची निर्दोष मुक्तता; एससी-एसटी कोर्टाने दिला निकाल. 

* बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचा नवा चित्रपट  लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'सेक्शन 84' या नव्या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची महत्वाची भूमिका.

* नागालँड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काॅग्रेस 7 जागी विजयी  राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद मिळणार, रामदास आठवले यांची आरपीआय 2 जागी विजयी. 

* राजस्थान हादरले! हाताला दोरी बांधून कालव्यात उडी घेत 7 जणांची आत्महत्या, जालोर जिल्ह्यात पती-पत्नीने आपल्या पाच चिमुकल्यांसह केली आत्महत्या 

* फ्रान्सचे माजी दिग्गज फुटबॉलपटू जस्ट फॉन्टेन यांचे निधन, 1958 च्या विश्वचषक स्पर्धेत त्यांनी झळकावले होते विक्रमी 13 गोल.

* संजय राऊत हे पुन्हा अडचणीत, दोन्ही सभागृहात राऊतांविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल ; विधिमंडळाचा 'चोर मंडळ' असा केला होता उल्लेख.

* राज्याच्या सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी आता १४ मार्च रोजी होणार

* सांगली, सातारा जिल्ह्याच्या शिवसेना संपर्कप्रमुखपदी राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती

* हाथरस प्रकरणात बलात्काराचा गुन्हा सिद्ध नाही, 3 जणांची निर्दोष सुटका, एकाला जन्मठेप 

* 12 वी उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे:कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाची घोषणा, निकाल वेळेत जाहीर होण्याचे संकेत.

* SEBI ने 24 YouTubers च्या चॅनलवर घातली बंदी; गुंतवणूकदारांची दिशाभूल आणि स्टॉक मार्केटचं नुकसान केल्याचा आरोप.

* राज्यभरात पारा वाढला ; मुंबई, रायगड, कोल्हापूरसह विदर्भात 5 ते 7 मार्च दरम्यान पावसाची शक्यता.

* नागालँडमध्ये हेकानी जाखलू यांनी केला नवा विक्रम; विधानसभा निवडणूक जिंकणाऱ्या ठरल्या पहिली महिला.

* नागालँडला 60 वर्षांनी मिळाली महिला आमदार: भाजपचा मित्रपक्ष असलेल्या एनडीपीच्या उमेदवार हेकानी जाखलू दिमापूर-3 मधून विजयी, जाखलू यांच्या विजयाने नागालँडने रचला नवा इतिहास  

* राज्य शासन अवैध उत्खननाबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार, धोरणात्मक निर्णय घेऊन या संदर्भात 13 मार्च रोजी बैठक होणार.

* अभिनेत्री सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका: अँजिओप्लास्टी सर्जरी झाली, इन्स्टाग्राम अकाउंटवर वडिलांसोबतचा फोटो शेअर करत दिली माहीती.

* राज्यातील अपर जिल्हाधिकारी व उप जिल्हाधिकारी संवर्गाची सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध होणार, या संवर्गातील रिक्त पदे भरतीप्रक्रिया तीन महिन्यांत सुरू करण्यात येणार.

* ऑस्ट्रेलियासमोर 76 धावांचे आव्हान:ऑस्ट्रेलियाविरूध्द भारताच्या दुसऱ्या डावात सर्वबाद 163 धावा, नॅथन लायनच्या सर्वाधिक 8 विकेट.

* महावितरणने अकोल्यातील बाळापूरमध्ये वीज चोरीच्या घटनांत 65 जणांवर केली कारवाई, बाळापूर शहरात एकूण 31 हजार 463 युनिटच्या वीजेच्या चोरीची प्रकरणे उघडकीस. 

* शेअर बाजार: सेन्सेक्स 501 अंकांनी घसरून 58,909.35 वर तर निफ्टी 129 अंकांनी घसरून 17,321.90 वर बंद.

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या