🌟परभणी शहरात वाहतुकीला शिस्त लागावी याकरिता २१ ठिकाणी ऑटोरिक्षा थांबे....!


🌟अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती अश्विनी स्वामी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली🌟

परभणी (दि.२३ मार्च) : शहरामध्ये वाहतुकीला शिस्त लागावी, आणि प्रवाशांनाही वाहतूक करणे सोयीचे आणि सुरक्षित व्हावे. त्यांच्यात सुरक्षित प्रवासाची भावना वाढीस लागावी, यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून २१ ठिकाणी ऑटोरिक्षा थांबे परिचलन पद्धतीने मान्य करण्यात आले आहेत,अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती अश्विनी स्वामी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. 

परभणी शहरातील नागरिकांची वाहतूक विनासायास व्हावी, यासाठी थांबे व रिक्षा थांबेक्षमता दर्शविली आहे. परभणी रेल्वे स्टेशनच्या आत आणि पार्कींगमध्ये २०,अनुसया टॉकिजसमोर, हजरत सय्यद शाह तुराबुल हक दर्गा कमानीच्या दक्षिण बाजुला, शासकीय रुग्णालय गेट क्रमांक ०१ व ०२ असे प्रत्येकी १० रिक्षा थांबविण्याची क्षमता निर्धारित करण्या्त आली आहे. 

गंगाखेड नाका,के.के.हॉस्पिटल समोर पश्चिम बाजूस,बाळासाहेब ठाकरे कमानीच्या बाजूला, विसावा कॉर्नर उजवी बाजू, गंगापुत्र कॉलनी दर्गा रोड, जनता मार्केट कोठारी कॉम्प्लेक्ससमोर, ग्रँड कॉर्नर अजिजिया लॉजसमोर, अपना कॉर्नर मौलाना अब्दुल कलाम चौक साने गुरुजी हॉस्पिटलसमोर, शनिवार बाजार शासकीय नेत्र रुग्णालयाजवळ, नारायण चाळ गोल्डन बेकरीसमोर, विसावा कॉर्नर एसबीआय बँकेच्या उजव्या बाजूस, गांधी पार्क गेटच्या डाव्या बाजूस, गुजरी बाजार, खानापूर फाटा (जुना पाईप कारखाना), काळी कमान वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ गेटच्या बाजूस, बसस्थानक गेट क्रमांक ०१ व ०२ प्रत्येकी पाच याप्रमाणे रिक्षा थांबविता येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती स्वामी यांनी कळविले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या