🌟अन् आज्जीबाई सहीसलामत शेगावहून आपल्या मुळगावी चंद्रपूरला पोहचली.....!


🌟रेल्वे सुरक्षा बलाचे प्रधान आरक्षक रंजन तेलंग,निरीक्षक चंद्रपूर श्री राय,प्रधान आरक्षक शशिकांत थोरात यांचे सर्वस्तरातून होत आहे कौतूक🌟


बुलढाणा/ जिल्ह्यातील शेगाव येथे काल गुरुवार दि.09 मार्च 2023 रोजी सकाळी 10-00 वाजेच्या सुमारास एक आजीबाईंनी रडत रडतच एका रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्याचा हात पकडला आणि सांगितले की माझ्यासोबतचे सर्व नातेवाई ट्रेन मधे गेले अन मी गर्दीत एकटी इथेच राहिली ज्याचा हात पकडला ते शेगाव रेल्वे सुरक्षा बलाचे चर्चित प्रधान आरक्षक रंजन तेलंग यांचा रंजन तेलंग यांनी आजीबाईला आस्थेवाईकपणे जवळ बोलावून नाश्ता दिला आणि प्रेमाने विचारपूस करत विचारले तर सत्य परिस्थिती समजली, रंजन तेलंग यांनी आजीबाईला आपल्या कार्यालयात बसवून ठेवले व दुपारी 04-00 वाजेला ओखा पुरी एक्सप्रेस मध्ये जाणाऱ्या 5 महिलांना माहिती देऊन आजीबाईला त्यांच्या सोबत नेण्यास सांगितले.


खाकी वर्दीतला माणूस आपल्याला मदत मागतोय म्हणून त्याही तात्काळ तैयार झाल्या रंजन तेलंग यांनी आजीला बसवून देऊन चंद्रपूर येथील रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक श्री.राय यांना कॉल वर माहिती देऊन मदत मागितली त्यांनी ही मदत देऊन शेवटी प्रधान आरक्षक शशिकांत थोरात यांना आजीला डायरेक्ट घरी पोहचवून देण्याचे आदेश दिले आणि शेवटी आजीबाई चंद्रपूर ला आपल्या घरी पोहचल्या .


आज रेल्वे सुरक्षा बलाचे प्रधान आरक्षक रंजन तेलंग,निरीक्षक चंद्रपूर श्री राय,प्रधान आरक्षक शशिकांत थोरात यांनी सर्वांनी आपआपली जबाबदारी पार पाडीत कर्तव्य बजावत एका वयोवृध्द आजीबाईला आपल्या घरी पोहचवल्यामुळे त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत असून त्यांच्या कर्तृत्वाला शतशः सलाम.....  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या