🌟हिंगोली जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई : गांजा तस्करी प्रकरणात लोहमार्ग पोलिस कर्मचाऱ्यासह दोघे अटक....!


🌟स्थागुशाने केलेल्या कारवाईत ३८ किलो वाळलेल्या गांज्यासह १४ लाख ६५ हजाराचा मुद्देमाल जप्त🌟

हिंगोली प्रतिनिधी

हिंगोली (दि.०३ मार्च) - हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक श्री जी.श्रीधर व जिल्ह्याच्या अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीमती अर्चना पाटील यांनी विशेष मोहिमे अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन कार्यवाही करण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक पंडीत कच्छवे यांना दिल्या होत्या त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या नेतृत्वात एक विशेष पथक नेमण्यात आले होते.


वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशा वरुन काल गुरुवार दि.०२ मार्च २०२३ रोजी विशेष पोलीस पथक माहिती काढत असतांना गोपनिय माहिती मिळाली की परभणी जिल्ह्यातून एका कार मध्ये अवैधरित्या गांजाची वाहतुक होत असुन ती कार औंढा (नागनाथ) येथील विश्रामगृहा समोर औंढा ते परभणी जाणारे रोडवर उभी आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्या नंतर पोलीस पथकाने योग्यती कायदेशीर प्रक्रीया पुर्ण करुन सायं.०५-०० वाजेच्या सुमारास औंढा नागनाथ येथील विश्रामगृहा समोर उभ्या असलेल्या एका पांढऱ्या रंगाची कार क्र. एमएच १२ केएन २१६० वर छापा मारला असता सदर कार मध्ये कार चालकासह अन्य दोघे आरोपी नामे रविंद्र अमरसिंग राठोड वय ३४ वर्ष व्यवसाय नौकरी (लोहमार्ग पोलिस पुर्णा) रा.कृष्णा ता.जि.वाशिम व शेख मोईनोद्दीन शेख वय ३६ वर्ष व्यवसाय मजुरी रा.भिमवाडा पुर्णा ता. पुर्णा जि. परभणी हे मिळुन आले असुन त्यांच्याकडील तीन बॅग मध्ये खाकी रंगाच्या चिकट टेपणे कागदाचे अवरणाला गुंडाळलेले एकुण १४ लहाण मोठे वेगवेगळ्या वजनाचे गांजाचे गठ्ठे ज्याचे एकुण वनज ३८ किलो ६०० ग्रॅम वजन किं.अं. ९,६५,०००/- व गुन्हयात वापरलेली कार असा एकुण १४,६५,००० /- रुपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो

जप्त केला असुन सदर प्रकरणात सपोनि शिवसांब घेवारे स्थागुशा हिंगोली यांनी दिलेल्या फिर्याद वरुन पोस्टे औंढा नागनाथ येथे गुरनं. ४६ / २०२३ कलम ८ (क), २० (ब) (क), २९ एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. अलीकडील काळात वाळलेला गांजा पकडलेली हि सर्वात मोठी कार्यवाही असून असल्याचे हिंगोली जिल्हा पोलिस दलाकडून समजते.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री जी. श्रीधर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. श्री पंडीत कच्छवे, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार संभाजी लकुळे, गजानन पोकळे, ज्ञानेश्वर पायघन, गणेश लेकुळे, चालक तुषार ठाकरे, प्रशांत वाघमारे, रविकांत हरकाळ, गजानन गिरी, पंजाब थिट्टे यांनी केली आहे....


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या