🌟पालम तालुक्यातील गणेशवाडी येथे महिको प्रा.लि.जालना तर्फे जागतिक महिला दिन साजरा....!


🌟या कार्यक्रमासाठी पालम तालुक्यातील गणेशवाडी येथे जवळपास ४५ शेतकरी महिला उपस्थित होत्या🌟

जगभरात महिला दिन दि.०८ मार्च रोजी सर्वत्र साजरा होत आहे. आजचा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा, अभिमानाचा अन् आनंदाचा दिवस आहे. आणि तो असणारच. कारण या जागतिक महिला दिनी अनेक ठिकाणी कर्तृत्ववान महिलांचे सत्कार होतात, पुरस्कार दिले जातात, महिलांच्या कार्याची दखल घेत सन्मान केला जातो, असा हा महिला दिन दरवर्षी आनंदात, उत्साहात साजरा केला जातो. तर महिला शेतकऱ्यांचे सन्मान होण्याची आवश्यकता लक्षात घेऊन महिको कंपनीकडून हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

इतिहासाची पाने चाळली तर.आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जागरूकता आणणे, तसेच महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे .

आज पुरुषांबरोबर स्त्रियादेखील शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत, शेतीमध्ये महिलांचे योगदान लक्षात घेऊन  त्यांचा  सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम महिको कंपनीने आयोजित केला होता, तरी या कार्यक्रमासाठी पालम तालुक्यातील गणेशवाडी येथे जवळपास ४५ शेतकरी महिला उपस्थित होत्या.

या कार्यक्रमांमध्ये शेतकरी महिलांना योग्य बियाण्याची निवड पीक नियोजन कशा प्रकारे करावे याविषयी टेरीटरी बिझनेस मॅनेजर श्री. शुभम भाबट यांनी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच महिको कंपनीचे कपाशी वान  धनदेव प्लस, जंगी, बाउन्सर, बाहुबली प्लस या वानाविषयी सविस्तर माहिती दिली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. स्वामी समर्थ बचत गट महिला तसेच प्रगतशील शेतकरी मारोतराव बल्लोरे आणि जनार्धन मग्नाले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.तसेच कार्यक्रमाच्या शेवटी महिको प्रायव्हेट लिमिटेड गंगाखेड ता. प्रतिनिधी अनिल चव्हाण यांनी उपस्थित महिला तसेच शेतकरी वर्ग  यांचे आभार मानले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या