🌟जिंतूरात कर्मचारी संपास अल्पप्रतिसाद तर नागरीकात तीव्र प्रतिक्रीया...!


🌟पहिल्याच दिवशी अंदोलनासाठी गर्दी आज दुसऱ्या दिवशी मात्र आंदोलकांचा मंडप मोकळा🌟

जिंतूर प्रतिनीधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेला संपाचा आज दुसरा दिवस होता दुसऱ्या दिवशी येथील तहसील कार्यालय समोरच्या मंडपात भेट दिली असता तेथील मंडपात शुकशुकाट होता तर अनेकांनी पहिल्या दिवशी फक्त चमकोगिरी केली.दरम्यान जिंतूरात कर्मचारी संपास अल्पप्रतिसाद तर नागरीकात तीव्र प्रतिक्रीया उमटल्या आहेत.


जिंतर येथे संपाचे हत्यार उपसल्या नंतर पहिल्याच दिवशी अंदोलनासाठी गर्दी केली मात्र आज दुसऱ्या दिवशी जिंतूरच्या तहसील कार्यालयासमोरील कर्मचाऱ्यांच्या वतीने टाकलेला मंडप अगदी मोकळाच होता आणि  संपाबाबत किती गांभीरता आहे याचं हे ताजं उदाहरण जिंतूर मध्ये दीसुन आले  सर्व तालुक्यातील  सरकारी कर्मचारी हे संपात सहभागी असले तरी नगरपरिषदेच्या माध्यमातून काम करणारी कायमस्वरूपी सरकारी मंडळी उपस्थित दीसुन आली नाही . मात्र जिंतूर नगर परिषदेत कंत्राट पद्धतीने लावलेल्या शेकडो कंत्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा आपल्या कामावर दांडी मारल्याची दिसून आले.  जिंतूर शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग काही ठिकाणी नाल्यातूंबल्याचे  दिसून येत आहे एकंदर संपात सुद्धा कुणाचा पायपोस कुणाला नाही अशीच काहीशी स्थिती जिंतूर तालुक्यात दिसून येत आहे. नागरिकांतून मात्र या संपाबाबत तीव्र प्रतिक्रिया असून भरमसाठ पगार घेऊनही परत पेन्शन साठी हट्ट का? व पेन्शन नाही मिळणार या  अटीवर नोकरी स्वीकारली असतानाही परत पेन्शन मिळण्यासाठी अट्टहास का ? आणि त्यासाठी संप पुकारून जनतेच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रकार अतिशय चुकीचा असल्याचे मत अनेकांनी उघडपणे व्यक्त केले आहे. एकंदर जिंतूर तालुक्यात संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांकडून संपात पाठ फिरवल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे.

* कर्मचारी संघटनेचा उपस्थिती बाबत दावा

---------------------------------------------

वरील संपाबाबत कर्मचारी संघटनेने संपासाठी 727 लोक असल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात संख्या अपुरी दिसून आली.कर्मचाऱ्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात 21 संघटना सहभागी झाल्याचे सांगण्यात आले असून या संपामध्ये सहकारी, नीम सरकारी, शिक्षक व शिक्षक  कर्मचारी संघटना ,आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, कृषी विभाग, पंचायत विभाग,   लेखा विभाग, बांधकाम विभाग, कल्याण विभाग, सामान्य शिक्षण संस्था त्याचबरोबर जिल्हा परिषद  सर्व विभागांच्या विभाग अंतर्गत सर्व संघटनांचे सर्वच कर्मचारी दिनांक 14 मार्च पासून बेमुदत संपात असल्याचा दावाही त्यांनीप्रसीध्दिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे पत्रकावर इंगोले,डी.एस. चाटे अदिच्यासह्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या