🌟उज्वल भविष्यासाठी स्त्री पुरुष समानता काळाची गरज - अमृतराज कदम


🌟जागतिक महिला दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते🌟

पूर्णा (दि.०८ मार्च) श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त श्री गुरुबुद्धिस्वामी संस्थेचे सचिव अमृतराज कदम यांनी महाविद्यालयातील सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.राजकुमार,उपप्राचार्य श्रीमती फातेमा शेख, कार्यालयीन अधीक्षक श्री अरुण डुब्बेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

 संस्थेचे सचिव अमृतराज कदम यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले कि, उज्वल भविष्यासाठी स्त्री पुरुष समानता ही काळाची गरज आहे. जागतिक महिला दिन सन्मान देण्यासाठी महिला सशक्तीकरण आणि मुला-मुलींमधील भेदभाव दूर करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. प्रत्येक घरातील स्त्री ही एक शक्तीपीठ असून तिचा आदर केल्यास समाजातील अन्याय, अत्याचार संपण्यास मदत होणार आहे. प्रत्येक महिला आपले कुटुंब सांभाळून आपले कर्तृत्वसिद्ध करत असते. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष मा. श्री प्रमोदअण्णा एकलारे सहसचिव मा. श्री गोविंदराव कदम तसेच कोष्याध्यक्ष मा उत्तमरावजी कदम यानीही यावेळी सर्व महिला करचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या