🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/बातम्या......!


🌟लोकसभेत ५३९ खासदारांपैकी २३३ खासदारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत🌟

 ✍️ मोहन चौकेकर 

* काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्याची अधिसूचना केली जारी ; देशासाठी लढत आहे, कुठलीही किंमत चुकवण्याची सुद्धा तयारी - राहुल गांधी 

* ट्वीटरचा वापरकर्त्यांना आणखी एक धक्का, ब्लू टीकसाठी पेड सबस्क्रिप्शन घेतले नाही तर ट्वीटरवरील ब्लू टिक हटणार 

* रत्नागिरीच्या खेडमधील भरणे गावातील एका घरातून जप्त केला सुमारे 80 पेक्षा जास्त गावठी बॉम्बचा साठा, वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी व्हायचा गावठी बॉम्बचा वापर

* भारत आठव्या क्रमांकाचा प्रदूषित देश, 20 सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी 14 शहरे भारतातील; आयक्यू एअर' स्विस एजन्सीचा जागतिक वायू गुणवत्ता अहवाल सादर

* छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील पात्र लाभार्थ्यांना लवकरच अनुदान; 1000 कोटी रुपये तरतूद, मार्च 2023 अखेर अनुदान देण्यात येणार

* नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदीवरील विष्णूपुरी प्रकल्पाच्या विशेष दुरुस्तीसाठी 125 कोटी रुपये निधी मिळणार ; राज्य सरकारचा निर्णय

* देशातील 1160 शैक्षणिक संस्थांनी अकॅडमी बँक ऑफ क्रेडिट मध्ये घेतला सहभाग, राज्यातील 110 शैक्षणिक संस्थांचा सहभाग; देशात सक्रिय असलेले पहिले चारही महाराष्ट्राचे विद्यापीठ यात आघाडीवर

* महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे पुरस्कार प्रदान; हिंदी साहित्य क्षेत्रात मोलाचे कार्य व भरीव योगदान देणाऱ्या साहित्यिक, लेखक पुरस्काराने सन्मानित

* बँक ऑफ इंग्लडकडून व्याजदरात पाव टक्क्यांची वाढ ;व्याजदरात झालेल्या ताज्या पाव टक्क्यांच्या वाढीने ते आता ४.२५ टक्क्यांवर गेले आहेत.

* पुण्यात पीएमपी चालकाचा असाही प्रताप, बस चालवताना मोबाईलवर बघत होता चित्रपट

* मोबाईल वरील चित्रपट बघत पीएमपी चालवणे म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळ आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.

* लोकसभेला 22, विधानसभेला 126 जागाच आम्हाला द्याव्या लागतील,आकडे बदलणार नाहीत,शिंदेंची शिवसेना कमजोर नाही - खा.गजानन कीर्तीकर

* लोकसभेला आमचा व्हिप ठाकरे गटाच्या खासदारांना लागू होत नाही विधानसभा, लोकसभेतली स्थिती वेगळी :शिवसेना संसदीय पक्षाचे नवे नेते गजानन कीर्तीकर 

* सीबीआय आणि ईडीच्या दुरुपयोगाबाबत 14 पक्षांची एकत्रितपणे सुप्रीम कोर्टात धाव

* अटकेआधी आणि अटकेनंतर काही गाईडलाईन्स असल्या पाहिजेत ही प्रमुख मागणी आहे.

* काँग्रेस, DMK, तृणमूल काँग्रेस, भारत राष्ट्र समितीसह 14 पक्षांची एकत्रित याचिका 5 एप्रिलला सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्ट तयार

* काँग्रेसच्या खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री रेणुका चौधरी यांनी पंतप्रधान मोदींविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार

* रेणुका यांनी ट्विटमध्ये लिहिले- ' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  मला राज्यसभेत शूर्पणखा म्हटले होते. मी त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणार आहे.…

* चोराला चोर म्हणणं हा आपल्या देशात गुन्हा ठरला : उद्धव ठाकरे

* "राहुल गांधी यांची खासदारकी अखेर रद्द करण्यात आली..चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे. चोर आणि देश लुटणारे आजही मोकळे आहेत आणि राहूल गांधी यांना शिक्षा ठोठावली गेली असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

* २३३ खासदारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल

* लोकसभेत ५३९ खासदारांपैकी २३३ खासदारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. म्हणजेच पूर्ण लोकसभेत ४३% खासदारांवर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये सर्वात जास्त भाजप (११६) तर नंतर काँग्रेसचा (२९) क्रमांक लागतो.

* Traders साठी महत्वाची बातमी :-

* अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी STT म्हणजेच Securities Transaction Tax मध्ये Options वर 23.5 % तर Futures वर 25 % ची वाढ केली आहे.

* नामांतरविरोधी याचिका फेटाळली! औरंगाबादच्या छत्रपती संभाजीनगर नामांतराला विरोध करणारी याचिका फेटाळली, सुप्रीम कोर्टात झाली सुनावणी 

* ट्वीटर युजर्सना मोठा धक्का! ब्लू टिक 1 एप्रिलपासून हटवण्यात येणार, ब्लू टीकसाठी पेड सबस्क्रिप्शन घेतले नसेल तर ब्लू टिक 1 एप्रिलपासून हटवण्यात येणार

* 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार: आशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

* भारत आठव्या क्रमांकाचा प्रदूषित देश: 'आयक्यू एअर' स्विस एजन्सीने जागतिक वायू गुणवत्ता अहवाल केला सादर, 20 सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी 14 शहरे भारतातील

* सोन्याचे आजचे दर: मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचे प्रती 10 ग्रॅमसाठीचे दर 60000 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचे प्रती 10 ग्रॅमसाठीचे दर 55000 रुपये

* ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर मोठा विक्रम! ठरला सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा फुटबॉलपटू, रोनाल्डोने कुवेतच्या बदर अल-मुतावालाला टाकले मागे

* शेअर बाजार: सेन्सेक्स 398 अंकांनी घसरून 57,527.10 वर तर निफ्टी 131 अंकांनी घसरून 16,945.05 वर बंद

* अभिनेत्री पूजा भट्टला कोरोना: अभिनेत्री पूजा भट्टला कोरोनाची लागण, ट्विटरद्वारे दिली माहिती; चाहत्यांना काळजी घेण्याचं केलं आवाहन                                                                

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या