🌟नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा ऐरणीवर...!


🌟अभ्यासक्रम अपूर्ण परंतु परीक्षांचे वेळापत्रक जाहीर🌟

परभणी (दि.11 मार्च) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर स्तरावरील सर्व अभ्यासक्रम अपूर्ण असतांना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने पदवी व पदव्युत्तर व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

               स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत प्रशासकीय स्तरावरील भोंगळ कारभाराचे एक-एक किस्सेच आहेत. त्यापैकी एक ताजा व तेवढाच गंभीर असा किस्सा समोर आला आहे. विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागाच्या सहाय्यक कुलसचिवांनी 10 जानेवारी 2023 रोजी पदवी व पदव्युत्तर स्तरावरील सर्व अभ्यासक्रमासंदर्भात एक परिपत्रक काढले. त्याद्वारे, सर्व संचालक, संलग्नित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना 30 एप्रिल 2023 पर्यंत शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या पार्श्‍वभूमीवर 30 एप्रिल पर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करावेत, असे निर्देश दिले होते. यासाठी आवश्यकता भासल्या सुट्टीच्या दिवशी ऑनलाई, ऑनलाईन ब्लेंडेड पध्दतीने शिकवणी वर्ग घ्यावेत व अभ्यासक्रम पूर्ण करावेत, असे स्पष्ट केले होते. या परिपत्रकाप्रमाणे विद्यापीठांतर्गत संचालक, लातूर उपकेंद्रांतर्गत संचालक तसेच सर्व संलग्नित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी संबंधितांना त्या आदेशाप्रमाणे सूचना दिल्या.

              या पार्श्‍वभूमीवर नांदेड विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांनी एक परीपत्रक जारी करीत पदवी व पदव्युत्तर तसेच व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. त्याद्वारे पदवीच्या लेखी परीक्षा 18 एप्रिल 2023 पासून सुरु होतील तर प्रात्यक्षिक परीक्षा 1 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीत पूर्ण होतील. व पदव्युत्तर तसेच व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा 3 मे पासून सुरु होतील, असे स्पष्ट केले व या संदर्भात संबंधित महाविद्यालयांनी कारवाई करावी, असे निर्देश दिले. विद्यापीठाच्या या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांनी 10 मार्च रोजी महाविद्यालयांना पाठविलेल्या या परिपत्रकावर 10 मार्च 2022 असा तारखेबाबत नामोल्लेख आहे, हे विशेष.

           दरम्यान, विद्यापीठाच्या स

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या