🌟नव्या विचारयुगाचा प्रारंभ करणारे युगकर्ते :छत्रपती शिवाजी महाराज - दिलीपदादा भोसले


🌟गुरु बुध्दीस्वामी महाविद्यालयात आयोजित छ.शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिरात ते म्हणाले🌟

पूर्णा (दि.१० मार्च) - येथील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर व वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते.


याप्रसंगी  कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव अमृतराज कदम,तसेच प्रमुख पाहुणे सहसचिव गोविंदरावजी कदम प्रमुख व्याख्याते म्हणून दिलीप दादा भोसले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.राजकुमार उपप्राचार्य श्रीमती फातेमा शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पुजन व दीपप्रजवलाने झाली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला पूजा ढोणे या विदयार्थीनीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर पावडा म्हटला. दिलीप दादा भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास विदयार्थ्यांनपुढे सादर केला.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न साकारणारे आणि लोकशाहीला अभिप्रेत असणाऱ्या कल्याणकारी राजवटीचं अधिष्ठान राजेशाहीला देणारे छत्रपती शिवाजी महाराज हे जगाच्या इतिहासातलं एक अलौकिक व्यक्तिमत्व होते.

छत्रपती शिवाजीमहाराजांनी डोंगरकपारीतील सामान्य मावळ्यांत अस्मिता निर्माण करून, स्वराज्याची प्रेरणा दिली. त्यांच्यात स्वत्वाची जाणीव झाल्यानेच आपल्याहून बलाढ्य शत्रूंशी गनिमीकाव्याने मावळे केवळ एक ऐतिहासिक घटना लढले. स्वराज्याची स्थापना ही केवळ एक ऐतिहासिक घटना नसून एका आधुनिक लोकशाहीचा युरोपमध्ये जेव्हा जन्मही झाला नव्हता, अशा सतराव्या शतकात, शिवरायांनी लोकशाहीला अभिप्रेत असणाऱ्या कल्याणकारी राजवटीचे अधिष्ठान राजेशाहीला दिले. रयतेला परकीय जोखडातून, गुलामगिरीतून तसेच एतद्देशीय वतनदारांच्या जुलमातूनही मुक्त केले. त्यासाठी वतनदारी नष्ट करून, नवी नोकरशाही निर्माण करून शिवरायांनी राज्यकारभार केला. न्यायापुढे सर्व लोक समान आहेत, हे सूत्र स्वीकारून त्याबाबतीत त्यांनी कोणाचाही मुलाहिजा ठेवला नाही.

सामाजिक समानता व धर्मनिरपेक्षता या आधुनिक जीवनमूल्यांचा त्यांनी स्वीकार केला होता. मध्ययुगीन भारताच्या पार्श्वभूमीवर ही एक महत्त्वाची मानवी इतिहासातील क्रांतिकारक घटना आहे. अनेक जगप्रसिद्ध प्रज्ञावंतांनी, इतिहासकारांनी महाराजांच्या ऐतिहासिक कार्याची चिकित्सा करून जगाच्या इतिहासावर उसा उमटवलेल्या अनेक ऐतिहासिक व्यक्तींची शिवरायांशी तुलना केली आहे. ह्या सर्वांहून महाराजांचे व्यक्तिमत्त्व हे भिन्न व श्रेष्ठ आहे.

नव्या विचारयुगाचा प्रारंभ करणारा एक युगकर्ता, राष्ट्रनिर्माता म्हणून छत्रपती शिवाजीमहाराजांची ओळख करून देण्याचा भोसले यांचा छोटासा प्रयत्न  महाराजांच्या सर्वच जीवनपैलूंवर प्रकाश टाकणे कठीण आहे, तरीही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मुख्य गाभा समजण्यासाठी आजचे व्याख्यान  मार्गदर्शक ठरेल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ. पुष्पा गंगासागर यांनी केले.  कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप   मा. श्री अमृतराज कदम यांनी  शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्वाच्या पैलूवर आपले विचार मांडले. रक्तदान करण्यासाठी भरपूर प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृंदावनी कदम व संध्या जोगदंड यांनी तर आभार डॉ.अजय कुऱ्हे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षत्तेर कर्मचारी विदयार्थ्या यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या