🌟परभणीत राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेचे शानदार उद्घाटन....!


🌟खेळाडूंद्वारे पथसंचलन : क्रिडा ज्योत प्रज्वलित करुन शुभारंभ🌟

परभणी (दि.28 मार्च) :  क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी व परभणी जिल्हा बॉलबॅडमिंटन असोसिएशन परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेस मंगळवार दि.28 मार्च 2023 रोजी प्रारंभ झाला.

              या स्पर्धेचे उद्घाटन खासदार संजय जाधव यांच्याहस्ते झाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडजकर, जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार, महाराष्ट्र राज्य बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.पी. के. पटेल, परभणी जिल्हा बॉल बॅडमिंटनचे अध्यक्ष उत्तमराव हत्तीअंबीरे, बॉलबॅडमिंटन राष्ट्रीय खेळाडू मधुकर निर्मल, स्पर्धा निरीक्षक शरद वाबळे, तालुका क्रिडा अधिकारी महेश खर्डेकर, राज्य क्रिडा मार्गदर्शक संजय मुंढे, प्रकाश होनवडजकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

             येथील जिल्हा क्रिडा संकूलाच्या मैदानावर 28 व 29 मार्च दरम्यान राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून  14 व 17 वर्षाखालील मुले/मुली गटात या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेकरीता राज्यभरातून 32 मुले/मुली व संघाती 340 खेळाडू परभणीत दाखल झाले आहेत. सदरील स्पर्धो बाद फेरीत खेळविण्यात येत आहेत.  स्पर्धेच्या पहिल्या दिवशी 14 वर्षातील मुले  गटात पहिला  सामना लातूर विरुद्ध नागपूर 35-22, 35-22 असा झाला यात नागपूरचा संघ विजयी झाला. दुसरा सामना मुंबई विरुद्ध पुणे  36-34, 35-17 असा झाला यात पुणे येथील संघ विजयी झाला.  तर  14 वर्षातील मुली गटात पहिला सामना छत्रपती संभाजीनगर विरुद्ध कोल्हापूर दरम्यान  35-23 35 22 भेट मध्ये  छत्रपती संभाजीनगरचा संघ विजयी ठरला. तसेच  17 वर्षे मुली गटात पहिला सामना अमरावती विरुध्द कोल्हापूर दरम्यान 35-30,35-31 सरळ सेट मध्ये अमरावतीचा संघ विजयी झाला.

            दरम्यान, कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांनी केले. सूत्रसंचालन संभाजी शेवटे यांनी तर आभार प्रदर्शन तालुका क्रीडा अधिकारी शैलेंद्र सिंग गौतम यांनी मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी राजेश शहाणे, सुशीलकुमार देशमुख, गणेश माळवे, शिवाजी वाघमारे, कैलास माने, विजयकुमार तिवारी आदींनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या