🌟पुर्णा येथील श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयाचा आशुतोष शिंदे अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र.....!


🌟आशुतोष शिंदे यांनी वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात 105 किलो वजन उचलून विद्यापिठात प्रथम क्रमांक पटकावला🌟

पूर्णा. (दि.०९ मार्च) - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आयोजित अखिल भारतीय अंतरविद्यापीठ वेटलिफ्टिंग या स्पर्धेत श्री गुरु बुद्धी स्वामी महाविद्यालय पूर्णा येथील आशुतोष लक्ष्मण शिंदे यांनी वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात 105 किलो वजन उचलून विद्यापिठात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच तो चंदिगड येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र झालेला आहे.  

आशुतोष शिंदे श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात कला शाखेत तृतीय वर्षात शिकत आहे. श्री गुरुबुद्धी स्वामी शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव श्री अमृतराज कदम तसेच सहसचिव प्रा. गोविंद कदम यानी आशुतोष शिंदेचा महाविद्यालयात सत्कार केला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ के. राजकुमार, उपप्राचार्य डॉ संजय दळवी, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री अनुशाल्व शेजुळ, पर्यवेक्षक श्री उमाशंकर मिटकरी, व्यवसायिक अभ्यासक्रम चे उपप्राचार्य श्री शेख सर, कार्यालयीन अधीक्षक श्री अरुण डुब्बेवार तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आशुतोष चा अभिनंदन केले. क्रीडा शिक्षक श्री सतीश बरकुंटे यांचे आशुतोष ला मार्गदर्शन लाभले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या