🌟नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डातील गैरप्रकारांबाबत सचखंड गुरुद्वारा प्रशासक डॉ.पसरीच्या यांना कायदेशीर नोटीस...!


🌟यावर दहा दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास वरिष्ठांकडे दाद मागण्याचा इशारा🌟

नांदेड (दि.२८ मार्च) - सचखंड श्री हजूर साहेब अबचलनगर साहेब गुरुद्वाराबोर्ड कार्यकारणी द्वारे मागील सत्तर वर्षापासून केलेल्या गैरकारभाराची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी स. रणजीतसिंग गिल व स.राजिंदरसिंघ पुजारी यांनी कायदेशीर नोटीस जारी केली आहे. यावर दहा दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास वरिष्ठांकडे दाद मागण्याचा इशारा कायदेतज्ञा मार्फत दिला आहे.


गुरुद्वारा सचखंड हुजूर साहेब अबचलनगरचे प्रशासक म्हणून परविंदरसिंग पसरिचा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती ही गुरुद्वारा बोर्ड अंतर्गत झालेल्या पैशाचा अपहार व तत्कालीन पदाधिकार्यांनी पदाचा दुरुपयोग करून केलेल्या बेकायदेशीर कामांची चौकशी करण्याच्या हेतूने व बोर्डाच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने केली आहे. मागील गुरुद्वारा बोर्ड कार्यकारणी 2019 ते 22 दरम्यान गुरुद्वारा बोर्डाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा उल्लेख करीत बँकेतील फिक्स डिपॉझिट अनधिकृतपणे तोडणे, दानपेटीतील रकमेची अफरातफर करणे, गुरुद्वार्‍याला सत्तर वर्षांत मिळालेले सोने वितळून अपहार केला तसेच तत्कालीन गुरुद्वारा बोर्ड अधीक्षक रणजितसिंग चिरागीया व त्यांचा भाचा रविंद्रसिंग बूंगई यांनी दहा किलो सोने वितळून तीन किलो सोन्याच्या वस्तू गुरुद्वारासाठी आणल्या यामध्ये सात किलो सोन्याचा अपहार झाल्याप्रकरणी एफआयआर दाखल करून नुकसान भरपाई मिळवून घ्यावी. यासह यात्रेकरूंसाठी बांधलेली रणजीतसिंग यात्री निवास विनाकारण तोडून लाखोचे नुकसान केले.  

     मार्च 2021 मध्ये कारस्थान रचून होला - महल्ला सणाला गालबोट लावून शिख समाजाची बदनामी केल्याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रणजीतसिंग गिल व राजिंदरसिंघ पुजारी यांनी केली आहे. याबाबत गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक सेवानिवृत्त पोलीस महासंचालक परविंदरसिंग पसरिचा यांना जिल्हा सत्र न्यायालयातील एडवोकेट जुबेर मोमीन यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस देऊन दहा दिवसाच्या आत कारवाई न केल्यास दोषी लोकांना पाठीशी घातल्या चे गृहीत धरून वरिष्ठांकडे दाद मागण्याचा इशारा दिला असून जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांनी माहितीस्तव प्रत दिली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या