🌟पुर्णा तालुक्यातील कानडखेड शिवारातल्या खाजगी गोदामातून चौदा क्विंटल हळद चोरी : तिन आरोपी गजाआड...!


🌟न्यायालयाने तिघा आरोपींना सुनावली चार दिवसांनी पोलिस कोठडी🌟

पुर्णा (दि.१४ मार्च) - पुर्णा तालुक्यातील शासकीय गोदामांच्या पाठोपाठ चोरट्यांनी खाजगी गोदामांना देखील लक्ष बनवल्याचे निदर्शनास येत असून मागील वर्षी २४ जुन २०२२ रोजी मध्यरात्री ०२-०० ते सकाळी ०८-०० वाजेच्या दरम्यान  तालुक्यातील कानडखेड शिवारातील धनगर टाकळी रोडवर असलेल्या चितलांगे यांच्या खाजगी गोदामाला लक्ष बनवून गोदामाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १४ क्विंटल हळद पळवल्याची घटना घडली होती या घटने संदर्भात पुर्णा पोलिस स्थानकात गोदाम मालक विशाल चितलांगे यांच्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.


या हळद चोरी प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरिक्षक भिमराव कांबळे यांच्याकडे देण्यात आला होता सदरील घटनेचा तपास तब्बल नऊ महिण्यांनी लावण्यात पोलिसांना यश मिळाले असून या घटनेतील तिघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून यात सय्यद अलिम सय्यद मनसुख,शेख अरबाज शेख जवाद,विष्णूकांत हिरामन कतूरे राहणार सर्व बाभूळगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली यांना ताब्यात घेण्यात आले असून या आरोपींना पुर्णा न्यायालया समोर हजर केले असता सन्माननीय न्यायालयाने तिनही आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या