🌟पुर्णा शहरात प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा अत्यंत धार्मिक व उत्साहपुर्ण वातावरणात साजरा....!


🌟शहरात काढण्यात आलेल्या श्रीराम जन्मोत्सवाच्या भव्य शोभा यात्रेत श्रीरामभक्त हनुमान यांचा सजिव देखावा ठरला लक्षवेधी🌟


पुर्णा (दि.३० मार्च) : पुर्णा शहरात प्रतीवर्षा प्रमाणे याही वर्षी श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने आज गुरुवार दि.३० मार्च २०२३ रोजी श्रीराम जन्मोत्सव अत्यंत धार्मिक वातावरणात धुमधडाक्यात साजरा करण्यात आला यावेळी श्रीराम नवमी निमित्त शहरातील प्रमुख मार्गांवरुन भव्य मिरवणूक काढण्यात आली होती शहरातील आनंद नगर परिसरातील श्री दक्षिण मुखी हनुमान मंदिर येथून भव्य मिरवणूकीला सकाळी ०९-०० वाजेच्या सुमारास सुरुवात झाली.

या भव्य श्रीराम जन्मोत्सव मिरवणूकीत महिलांनी ढोल ताशाच्या गजरात व लहान लहान मुलांनी वानर सेना रुपी देखावे सादर करत व तसेंच प्रभू श्री राम श्री हनुमान यांच्या वेशभूषा धारण करून श्रीराम व श्रीराम भक्त हनुमान यांचे सजिव देखावे सादर करण्यात आले होते यावेळी भव्य अश्वरथात प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी शहरातील महाविर नगर येथील ओझा यांच्या घरा जवळ श्रीराम भक्तांना शरबतचे वाटप करण्यात आले भव्य शोभा यात्रेत विविध देखावे सादरीकरण करण्यात आले. यावेळी श्री.दक्षिण मुनी हनुमान मंदिर आनंद नगर येथून निघालेली मिरवणूक आनंद नगर चौक,भगवान महाविर नगर,महात्मा बसवेश्वर चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौकातील 'शिवतिर्थ' संत नरहरी महाराज चौक आदींसह शहरातील विविध मार्गांवरुन काढण्यात आली यानंतर जुना मोंढा परिसरातील श्रीराम मंदिर येथे मिरवणूक पोहोचल्या नंतर प्रभू श्रीरामचंद्र यांची यांनी आरती करुन श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.  

या श्रीराम जन्मोत्सव शोभा यात्रेत शेकडो श्रीराम भक्तांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला दरम्यान संध्याकाळी ०६-०० वाजता श्रीराम मंदिर येथे भव्य दिपोत्सव साजरा करण्यात येणार आहे श्रीराम नवमी निमित्त भव्य शोभा यात्रेचे आयोजन श्रीराम जन्मोत्सव समिती पुर्णा च्या वतीने करण्यात आले होते यावेळी प्रभू श्री रामांच्या गगनभेदी जयघोषाने संपूर्ण शहर परिसर दुमदुमून गेला होता........


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या