🌟केंद्रातील मोदी सरकारचा पुन्हा गॅस सिलेंडर दरवाढ स्फोट : गॅस सिलेंडर दर वाढीमुळे सर्वत्र संताप...!

🌟एलपीजी गॅस सिमेंटर ५० तर व्यवसायिक सिलेंडर ३५० रुपयांनी महागले🌟

परभणी (दि.०१ मार्च) : गेल्या काही महिन्यांपासून सर्वसामान्य नागरीकांसह मध्यमवर्गीय भडकलेल्या महागाईने अक्षरशः होरपळून निघाले असतांना केंद्रातील मोदी सरकारने आज बुधवार दि.०१ मार्च रोजी एलपीजी गॅस सिलेंडर मागे ५० रुपयांनी तर व्यवसायिक सिलेंडर मागे ३५० रुपयांनी वाढ करीत गॅस सिलेंडर ग्राहकांना स्फोटक दरवाढ करीत जबरदस्त तडाखा दिला आहे.

          पेट्रोल व डिझेल या इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या आठवड्यातच कर्जावरील व्याजदरात रिझर्व्ह बँकेने मोठी वाढ केली. पाठोपाठ आता पाच राज्यातील निवडणूकीच्या मतदाना पाठोपाठ केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या दरात लक्षणीय वाढ केली. एलपीजीचे प्रति गॅस सिलेंडर 50 रुपयांनी तर व्यवसायिक सिलेंडरच्या दरात 350 रुपयांनी दरवाढ करीत ग्राहकांना मोठा तडाखा दिला.

          तेल कंपन्यांनी बुधवारी या संदर्भात दरवाढ करीत सर्वसामान्य नागरीकांच्या तोंडचे पाणी पळविले. या दरवाढीने गॅस सिलेंडर आता राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडर १ हजार ५२ रुपयांएवेजी १ हजार १०३ रुपये तर व्यवसायिक वापराचे सिलेंडर नवी दिल्लीत १ हजार ७६९ रुपयांऐवजी २ हजार ११९ रुपये ५० पैसे पडणार आहे. अन्य महानगरात सर्वसाधारणपणे तेच दर असणार आहेत.

         दरम्यान, गॅस सिलेंडरमध्ये केलेल्या भाववाढीच्या वृत्ताने सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते कमालीचे संतप्त झाले आहेत. तर सर्वसामान्य नागरीकांनीसुध्दा या प्रचंड भाववाढीबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या