🌟दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने कोट्ट्यावधीच्या संपत्तीवर चालवले बुलडोजर अन् पुर्णेकरांना दाखवले गाजर....!

🌟जगात जर्मनी भारतात परभणी अन् परभणीत पुर्णा ? अन् काय दुर्दैव पुर्णेच्या हक्काच गिळायला यांना काहीच पुरणा🌟

🌟दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाची बेबंदशाही ? पुर्णेतील रेल्वेची महत्वाची कार्यालय पळवण्याची भलतीच घाई ?


🌟पुर्णेकरांच्या हक्काच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयासह पळवली विस/बावीस कार्यालय नांदेडला🌟

✍🏻 भाग क्रमांक २ : परखड सत्य : चौधरी दिनेश 

'जब चिड़ियाँ चुग गई खेत अब पछताये क्या होत'

'वेळेवर प्रयत्न केल्यास पुन्हा पश्चात्तापाची वेळ येत नसते वेळ निघून गेल्यानंतर केलेल्या निष्फळ प्रयत्नांसह झालेला पश्चात्ताप हा मागील काळात झालेल्या नुकसानीची सातत्याने आठवण करुन देत असतो' 


पुर्णेकरांची एकंदर अश्याच प्रकारची दयनीय अवस्था झाल्याचे निदर्शनास येत असून दक्षिण मध्य रेल्वे विभागा अंतर्गत निजाम/ब्रिटीश काळापासून अत्यंत महत्वाचे रेल्वे जंक्शन व पुलींग पॉईंट असलेले पुर्णा जंक्शन पुर्वी सिकंद्राबाद/हैद्राबाद डिव्हीजन अंतर्गत असतांना पुर्णेत उपविभागीय स्तरावरील सर्वच प्रकारची महत्वाची कार्यालय या ठिकाणी कार्यान्वित होती परंतु मानापमान आणि राजकीय सुडसत्रात पुर्णा रेल्वे जंक्शनच्या वैभवाची सोईस्कररित्या अक्षरशः वाट लावण्यात आली पुर्णा जंक्शन येथे तब्बल १८० एक्कर जमीनीसह ९७१ निवासस्थान,२५ कार्यालयीन इमारती,४ दोन मजली इमारती,४ तिन मजली इमारती,२ सुसज्ज रुग्नालय,१ सर्व सुविधायुक्त कम्युनिटी हॉल,१ रेल्वे इस्टीट्यूट,इलेक्ट्रिक पॉवर हाऊस,१ स्वतंत्र पाणीपुरवठा योजना,१ भव्य रेल्वे लोको शेड वर्कशॉप,१ रेल्वे मराठी माध्यम शाळेसह ज्युनाअर कॉलेज,१ रृल्वे इंग्रजी माध्यम शाळा,१ रेल्वे तेलगू माध्यम शाळा,१ डि.ईएन ऑफिस,१ ए.ईएन ऑफिस,१ आय.ओ.डब्ल्यू ऑफिस,१ पि.डब्ल्यू ऑफिस१ टि.एक्स.आर ऑफिस,१ क्र्यू-बुकींग लॉबी,१ आर.पी.एफ पोलिस स्थानक,१ जिआरपी पोलिस स्थानक,१ टि.टी.ई.ऑफिस,सुसज्ज रेल्वे प्ले ग्राऊंड (मिनी स्टेडीएम) बॉस्केट बॉल प्ले ग्राऊंड,एरिया ऑफिस मिनी डिआरएम ऑफिस,कंट्रोल ऑफिस,रेस्ट हाऊस रनींग रुम,गुड्स शेड,२ पीट लाईन,मार्शल यार्ड,ब्रेक डाऊन कर्मचारी ऑफिस,ट्रेन लाईटींग स्टॉफ,ड्रायव्हर/गार्ड रनींग रुम आदी सुविधा उपलब्ध असतांना देखील येथील हक्काचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय (डिआरएम ऑफिस) नांदेडला एक एक्कर देखील जमीन किंवा कुठल्याही प्रकारच्या अन्य सुविधा उपलब्ध नसतांना पुर्णेतील रेल्वेच्या कोट्यावधी रुपयांच्या संपत्तीला मुठमाती देऊन नांदेड येथे कोट्यावधी रुपयांचा अतिरिक्त खर्च करीत दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय (डिआरएम ऑफिस) नांदेड येथे जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आले.


दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनात कार्यरत भाषावाद/प्रांतवादाला खतपाणी घालणारे अधिकारी/कर्मचारी आणि मानापमानाच्या मुद्यावरुन पुर्णेकरांवर सुड उगवणाऱ्या असंतुष्ठ तत्वभ्रष्ट राजकारणी पुर्णा जंक्शनच्या विकसनशील वैभवावर एकामागून एक घाव घालीत असतांना जिल्ह्यातील आत्मघातकी संधीसाधू राजकारण्यांनी वेळोवेळी धृतराष्ट्राची भुमीका साकारल्यामुळे येणारा काळ पुर्णा जंक्शन/पुर्णेकर नागरिकांसह युवा पिढीच्या भविष्यासाठी अत्यंत भयावह असल्याने या सुडसत्रा विरोधात लोकशाही मार्गाचा अवलंब करुन सन १९९२/९३ पासून सतत संघर्ष करणाऱ्या पुर्णा तालुका संघर्ष समितीतील दुरदृष्टे जेष्ट काँग्रेस नेते स्व.भुजंगरावजी कदम,ओंकारसिंहजी ठाकूर,जेष्ठ रिपाई नेते प्रकाश कांबळे,जेष्ठ सामाजसेवक तथा आरोग्य तज्ञ डॉ.दत्तात्रयजी वाघमारे,जेष्ठ पत्रकार विजयजी बगाटे,जेष्ठ पत्रकार ॲड.संजयजी गव्हाणे,ॲड.अब्दुल सईद साहेब,जेष्ठ पत्रकार सतिषजी टाकळकर,जब्बारजी थारा,अब्दुल मुजीब,स्व.राजेंद्रबाबू कमळू यांनी शहरासह संपूर्ण तालुक्यातील व्यापारी संघटना,सामाजिक संघटनांसह राजकारणी मंडळी लोकप्रतिनिधींना वेळोवेळी सतर्क करण्याचा प्रयत्न तर केलाच याशिवाय दिल्लीपर्यंत धडक देऊन रेल्वे मंत्र्यांसह विविध केंद्रीय मंत्र्यांशी देखील संपर्क साधून त्यांना या संदर्भात सविस्तर माहितीसह निवेदनही दिली. 

या काळात दक्षिण मध्य रेल्वे प्रशासना विरोधात रेल रोको आंदोलन देखील करण्यात आले परंतु त्यांच्या या संघर्षाला व्यापारी संघटना/सामाजिक संघटनांसह जनमतातून निवडून आलेल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी खंबीरपणे पाठबळ न दिल्यामुळे आज पुर्णा जंक्शनची अवस्था एखाद्या लोकल रेल्वे स्थानका प्रमाणे झाली असून साडेतीन/चार दशकापुर्वी ज्या पुर्णा जंक्शनवर तब्बल पाच हजार रेल्वे कर्मचारी कर्तव्य बजावत होते त्या मराठवाड्यातील सर्वात मोठ्या पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावर बोटावर मोजण्या इतके कर्मचारी कर्तव्य बजावत असून परिसरातील दोनशें निवासस्थान दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने जमीनदोस्त केल्यामुळे संपूर्ण परीसर भकास तर झालाच आहे याशिवाय गुन्हेगारांसाठी अभयारण्यासमान झाल्याचे निदर्शनास येते रेल्वे परिसरातील रेल्वे कर्मचारी पुर्वी राहत असलेली असंख्य निवासस्थान व महत्वाची कार्यालय अक्षरशः भुतबंगल्यात रुपांतरीत झाली असून या निवासस्थानांचा वापर अनैतिक व्यवहारांसाठी केल्या जात असल्यामुळे परिसरासह आसपासच्या परिसरातील रहिवासी/नागरीक दहशतीखाली वावरतांना निदर्शनास येत आहे.


दक्षिण मध्य रेल्वे प्रशासना अंतर्गत येणाऱ्या मराठवाड्यात डिझेल रेल्वे गाड्यांचे रुपांतर आता इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये होणार असल्यामुळे आता इलेक्ट्रिक लोको ट्रिप शेड पुर्णा जंक्शन येथे बनवण्यात येईल अशी अपेक्षा पुर्णेकरांतून व्यक्त केली जात होती परंतु पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकाला संपूर्णतः भकास करण्याचा विडा उचलणाऱ्या दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनातील भाषा/पांतवाद्यांसह राजकीय क्षेत्रातील असंतुष्ट आत्म्यांनी दि.२० जानेवारी २०२३ रोजी इलेक्ट्रिक लोको ट्रिप शेड नांदेड येथे स्थापण करण्याचे आदेश जारी करुन पुन्हा एकदा पुर्णेकरांच्या अपेक्षा अक्षरशः पायदळी तुडवल्यामुळे जनसामान्यांमध्ये तिव्र असंतोष पसरला आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या