🌟पुर्णा शहरासह तालुक्याच्या सर्वांगीन विकासासाठी निस्वार्थ परिपक्व राजकीय नेतृत्वाची आवश्यकता...!


🌟कृषी क्षेत्रासह,उद्योग,व्यापार क्षेत्रात जिल्ह्यात आघाडीवर असलेल्या तालुक्याच्या अधोगतीला शेवटी जवाबदार कोण ?🌟

✍🏻भयान वास्तव - चौधरी दिनेश (रणजीत)

ब्रिटीश/निजाम काळापासून दक्षिण मध्य रेल्वेचे मराठवाड्यातील सर्वात मोठे महत्वाचे रेल्वे जंक्शन जवळपास दोन डजन रेल्वेची उपविभागीय कार्यालय शेकडो कर्मचारी निवासस्थानांची व्यवस्था अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी विश्रामगृह भव्य असे चार लोको शेड जवळपास पाच हजार रेल्वे कर्मचारी चोवीस तास कार्यरत त्यामूळे व्यापारपेठ सतत गजबजलेली त्यातच औद्योगिक क्षेत्रात दोन तिन ऑईल मिल,तिन चार कॉटन मिल,पोहा मिल,मुरमुरा फॅक्टरी त्यामुळे उद्योग क्षेत्रातही आघाडी तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी- पुर्णा नद्यांमुळे कृषी क्षेत्रातही आघाडीवर मुबलक प्रमाणात पाण्याची व्यवस्था असल्यामुळे गहू,ज्वारी,हरबरा,तुर,उडीद,भुईमुग,कापूस,करडी,उसासह संत्रा मोसंबी बागायती पिंकांचे देखील मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत होते त्यामुळे कृषी प्रधान तालुका म्हणून तालुक्याची एक वेगळी ओळख होती परंतु अंदाजे तिन/साडेतील दशकापुर्वीची ही सर्वात सधन तालुका म्हणून असलेली पुर्णा तालुक्याची ओळख संपूर्णतः मिटवण्याचे व तालुक्याला देशोधडीला लावण्याचे दुष्कृत्य संधीसाधू कुटील राजकारण्यांनी केल्यामुळे एकेकाळी परभणी-हिंगोली जिल्ह्यात सर्वात विकसित व सधन असलेला पुर्णा तालुका कायम पिछाडीवर गेल्याचे निदर्शनास येत आहे.


पुर्णा शहरासह तालुक्यातील औद्योगिक क्षेत्राला विकसित करण्याच्या दृष्टीने मागील पाच/सहा दशकापूर्वी तत्कालीन राजकीय पक्ष पुढाऱ्यांसह उद्योजकांनी शहरात प्रथमतः जैन जिनिंग,वैभव जिनिंग,लाल मिल अँड जिनिंग,पुर्णा सहकारी जिनिंग,एकलारे यांची महालक्ष्मी ऑईल मिल,चिटणीस यांची दाल मिल,कापसे बंधू यांची पोहा मिलसह शहरात पाच तेल घाणे होते यात लक्ष्मणराव तेजबंद यांचा तेलघाना,सुभानराव तेजबंद यांचा तेलघाना,मैनाबाई तेजबंद यांचा तेलघाना,विठ्ठलदासजी काका राठोड यांचा तेलघाणा आदी तेलघान्यांचा समावेश होता या तेलघान्यांच्या माध्यमातून पुर्णेकरांना शुध्द शेंगदाणा,करडी तेल मिळत होते परंतु कालांतराने परिस्थिती बदलत गेली आणि औद्योगिक क्षेत्रालाही काळाची दृष्ट दृष्टी लागली असेच म्हणावे लागेल या जिनिंग,ऑईल मिल,पोहा मिल,दाल मिलांच्या माध्यमातून शेकडो हातांना त्या काळात काम मिळून शेकडो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता परंतु कालांतराने परिस्थिती बदलत गेली अन् वाढती बेरोजगारी तत्वभ्रष्ट राजकीय पुढाऱ्यांना हिताची झाली त्यामुळे रोजगार निर्मितीच्या दृष्टीने पाऊल उचलली तर फुकटात राबराब राबणारे कार्यकर्ते आणायचे कुठून ? या प्रश्नाने भेदरलेल्या संधीसाधू पुढाऱ्यांनी औद्योगिक क्षेत्राच्या विकासाचे सर्वच मार्ग कायम बंद करून खानावळीच्या नावावर अवैध देशी/विदेशी दारु विक्री करीत तरुणांना वाम मार्गाला लावणारी 'धाबा संस्कृती' तरुण पिढीला कर्करोगा सारख्या जिवघेण्या विषारी विळख्यात अडकवणारी अवैध तंबाखूजन्य गुटखा पुड्यांच्या गोरखधंद्यांसह जुगार/मटका अड्यांना प्रोत्साहन देणारी दृष्ट प्रवृत्ती तरुण पिडीचे आयुष्य उध्वस्त करणार नाही तर काय ? पुर्वी नेते मंडळी आपल्या कार्यकर्त्यांना पोटापाण्याला लावण्याच्या दृष्टीने शासकीय/निमशासकीय कार्यालयांसह कंपन्यांमध्ये नौकरीसाठी आपल्या पद प्रतिष्ठेचा वापर करीत होते आता मात्र कार्यकर्त्यांना धाबे,पानटपऱ्या,जुगार अड्डे,मुंबई-कल्याण मटका अवैध गुटखा,अवैध देशी/विदेशी दारु विक्री,अवैध गौण खनिज वाळू चोरी/वाळू तस्करी करण्याचा मार्ग दाखवून त्यांचे आयुष्य उध्वस्त करीत स्वतःचा स्वार्थ साधणारे तत्वभ्रष्ट संधीसाधू पुढारी उदयास आल्यामुळे संपूर्ण तालुक्याच्या विकासासह तरुण पिढीच्या भविष्याची संपूर्णपणे वाट लागल्याचे निदर्शनास येत आहे. 

पुर्णा तालुक्यातच काय तर संपूर्ण परभणी जिल्ह्यात असा एकही लोकप्रतिनिधी नाही ज्या लोकप्रतिनिधीने बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करुण देण्याच्या दृष्टीने औद्योगिक क्षेत्राच्या विकासावर भर देऊन औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलली असेल उलट उद्योग धंद्यांना टाच लावण्याचे गंभीर प्रकार झाल्याचे निदर्शनास येत आहेत पुर्णा तालुक्यात जिल्ह्या बाहेरील उद्योजकांनी बळीराजा साखर कारखाना व रिलायबल ॲग्रो फुड्स या नावाने दोन कारखाने तालुक्यातील कानडखेड शिवारात उभारले खरे परंतु कारखाना प्रशासनाकडून शासकीय नियमानुसार ८०% स्थानिक बेरोजगार तरुणांना प्रथमतः नौकऱ्यांची संधी देणे बंधनकारक असतांना संबंधित कारखाना प्रशासन बाहेराच्या जिल्ह्यातील लोकांचा भरणा मोठ्या प्रमाणात करीत असल्यामुळे स्थानिक तरुणांपुढे बेरोजगारीचा गंभीर प्रश्न निर्माण होऊन ते अन्य अनैतिक व्यवसायांकडे आपला मोर्चा वळवून आपले भविष्य उध्वस्त करुण घेत असल्याचे निदर्शनास येत आहे.


पुर्णा शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात शासकीय गायरान जमिनी उपलब्ध असतांना देखील चार/पाच दशकापुर्वी तत्कालीन लोकप्रतिनिधी/राजकीय पुढाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थापोटी जागा उपलब्ध न करुन दिल्यामुळे पुर्णा सहकारी साखर कारखाना हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात तर थर्मल पॉवर सेंटर बिड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे उभारण्यात आले संबंधित कारखाने जर पुर्णा तालुक्यात असते तर आज बेरोजगारीचा गंभीर प्रश्न तर मिटलाच असता याही पेक्षा महत्वाची बाब म्हणजे व्यापार क्षेत्रालाही भरभराटी मिळाली असती परंतु मागील अनेक दशकापासून पुर्णा तालुक्याला निस्वार्थ व परिपक्व राजकीय नेतृत्व लाभले नसल्यामुळे परभणी-हिंगोली जिल्ह्यात सर्वात सधन असलेल्या या पुर्णा तालुक्याची अक्षरशः वाट लागली असे म्हणने यत्किंचितही चुकीच ठरणार नाही.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या