🌟पुर्णा तालुक्यातील वझुर व ताडकळस गटात केंद्रस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन.....!


🌟सर्व जिल्हा परिषद शाळेत येत्या ३१ मार्च रोजी सकाळी दहा ते साडेअकरा या कालावधीत सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन🌟 

पुर्णा (दि.३० मार्च) :- वाढत्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या काळात वाचन कमी होत चालले आहे. शालेय तसेच महाविद्यालयीन स्तरावरही मुले मोबाईलच्या व्यसनात अडकलेली पाहायला मिळतात. त्यामुळे वाचनाची गोडी वाढावी आणि महापुरूषांच्या कार्याची जनजागृती व्हावी, यासाठी आ.डाॅ.रत्नाकर गुट्टे (काका) मित्रमंडळाचे जिल्हा संपर्क प्रमुख संदीप माटेगावकर यांच्या संकल्पनेतून आणि मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठान व आ.डॉ.गुट्टे (काका) मित्र मंडळाच्या वतीने वझुर व ताडकळस केंद्रातील सर्व जिल्हा परिषद शाळेत येत्या ३१ मार्च रोजी सकाळी १० ते ११.३० या कालावधीत केंद्रस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन केले आहे. 

हि परीक्षा इयत्ता ५ ते ९ वी मधील विद्यार्थ्यांसाठी ५० गुणांची बहुपर्याय पध्दतीची असेल. त्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका असणाार आहे. परीक्षेचे आयोजन पूर्णा तालुक्यातील ताडकळस, फुलकळस, देउळगाव आणि गणपूर केवळ या केंद्रासाठी मर्यादित आहे. विजेत्या विद्यार्थ्यांना गंगाखेड विधानसभेचे आ.डाॅ.रत्नाकर गुट्टे यांच्या शुभहस्ते आकर्षक बक्षिसे व शालेय उपयोगी साहित्य देऊन गौरविण्यात येणार आहे. 

मोबाईल आणि सोशल मिडीयामुळे आजची पिढी वाचनापासून दुर होत आहे. त्यामुळे मुलांना अभ्यासक्रमांच्या बाहेर जाऊन महापुरूष समजावून सांगणे काळाची गरज आहे. तरच उद्याच्या पिढीमध्ये मानवी मूल्ये रूजतील. जातीय भिंतीत महापुरूषांची होणारी वाटणी थांबवायची असेल तर मुलांना महापुरूषांचे विचार आणि कार्य ओळख झाली पाहिजे, त्यासाठी हि परीक्षा आयोजित केली आहे, अशी माहिती मुख्य आयोजक जिल्हा संपर्क प्रमुख संदीप माटेगावकर यांनी दिली. 

दरम्यान, मुलांच्या बैध्दिक विकास वृध्दीसाठी अशा उपक्रमांची नेहमी गरज असते. त्यातून मुले किमान दोन-चार पुस्तके वाचतील. जेणेकरून त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात भर पडेल. त्यामुळे अभ्यासू आणि चिंतनशील वक्ते संदीप माटेगावकर यांनी आयोजित केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे, असे पूर्णाचे तालुका गटशिक्षणधिकारी एम.एस.सुर्यवंशी यांनी सांगितले........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या