🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या....!


🌟स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक प्रकरणी सुप्रीम कोर्टातील सुनावणी 28 मार्चला : ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा पुन्हा लांबणीवर🌟

✍️मोहन चौकेकर

* कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतनात वाढ करण्याबाबत केंद्र शासनाला विनंती करणार, कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे यांची माहीती.

* स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रकरणी सुप्रीम कोर्टातील सुनावणी 28 मार्चला,ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा पुन्हा लांबणीवर.

* मुंबईतील टेक्स्टाईल आयुक्तांचं कार्यालय दिल्लीला हलविण्याचा कुठलाही निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहीती.

* केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा धमकीचे फोन,गडकरी यांच्या संपर्क कार्यालयात फोन वाजला आणि जीवे मारण्याची दिली धमकी. 

* सरकारी शैक्षणिक संस्था, नोकऱ्यांमध्ये तृतीयपंथीयांना आरक्षणाबाबत विचार करा, 3 महिन्यांत अहवाल सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे राज्य सरकारच्या समितीला आदेश.

* लातूरमधील बालविवाहाचे प्रमाण चिंताजनक, महिला व बाल विकास अधिकारी यांनी समुपदेशन, कायदेविषयक माहिती देऊन रोखले 3 बालविवाह.

* AI वापरामुळे नोकऱ्या जाण्याची भीती, पण भारतात आर्टिफिशिएल इंटेलिजेंसमध्ये 45 हजार नोकऱ्या रिक्त  असल्याची TeamLease या डिजिटल फर्मची माहिती  

* Jio True 5G सर्व्हिस 406 शहरांमध्ये सेवा झाली सुरू ; ट्रू 5जी नेटवर्क लॉन्च करणारी जिओ ठरवी देशातील पहिली कंपनी

* पुणे जिल्ह्यातील धरणांतील पाण्याचे प्रदुषण रोखण्यासाठी ठोस कार्यक्रम राबवा, विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी.

 * रायगड जिल्ह्यात अवेळी पावसाचे आगमन; जनजीवन विस्कळीत, आंबा, कांदा उत्पादकांना फटका.

* स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्नुषा स्वामिनी सावरकर यांचे निधन.

* समृद्धी महामार्ग बनला मृत्यूमार्ग! 100 दिवसात झाले 900 अपघात.

* साईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय द्या: बाळासाहेब थोरात.

* "तुम्ही JPCची मागणी सोडा, आम्ही राहुल गांधींच्या माफीची मागणी सोडू', काँग्रेसचा केंद्रावर आरोप

*मोदी साहेब भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने होऊ द्या! आफ्रिदीची विनंती

* भीषण अपघात : बोलेरोचे टायर फुटल्याने गाडी चार वेळेस पलटली; तिघांचा मृत्यू, तुळजाभवानीच्या दर्शनाला जाताना अपघात

* ब्लॅकमेलिंग केस : अमृता फडणवीस धमकी प्रकरणी ‘बुकी’ अनिल जयसिंघानी यांना 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी.

* राज्यातील शेतकऱ्याच्या खात्यात येणार 4000 हजार रुपये.

*आनंदी देशांच्या यादीत भारत 136 वा ? 'वाहरे अच्छे दिन' : आनंदी देशांच्या यादीत युद्ध करून रशिया 74  आणि युक्रेन 108, दिवाळखोरीत निघून पाकिस्तान 103, श्रीलंका 126

* हसायला बंदी असावी असा चीन 82,आणि भारत 136.

* समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात नियंत्रित करण्यासाठी वाहन चालवणाऱ्यांचे सक्तीने समुपदेशन करण्यात येणार आहे. त्यासाठी नागपूर ते शिर्डी मार्गावर ८ समुपदेशन केंद्र तयार केले जाईल.

* मंगळवारी नागपुरात  परिवहन खाते व महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) बैठकीत हा निर्णय झाला.

* डेटा सायटिंस्ट व मशीन लर्निंगमध्ये ४५ हजार जॉब ओपनिंग.

* जगभरात सध्या अनेक क्षेत्रात कर्मचारी कपात सुरु आहे. खासकरुन टेक कंपन्यांमध्ये ही कपात जोरात आहे. परंतू दुसरीकडे आयटी क्षेत्रात सध्या डेटा सायटिंस्ट व मशीन लर्निंगसाठी ४५ हजार जॉब ओपनिंग्ज आहेत. 

* यामध्ये स्क्रिप्टींग व मशीन लर्निंग मॉडेल बनविण्यावर कंपन्या भर देत आहे. मशीन लर्निंग इंजीनिअरला वार्षिक सरासरी १४ लाख तर डेटा आर्किटेक्टला १२ लाख रुपये पगार दिला जात आहे.

* जर अशा कर्मचाऱ्याकडे ८-९ वर्षांचा अनुभव असेल तर हा पगार २५ लाख ते ४५ लाखांच्या दरम्यान दिला जात आहे. देशभरातील ३७ टक्के कंपन्या या आर्टिफिशीअल इंटेलिजन्सवर गुंतवणूक करत आहे. 

* महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसोबत घ्याव्यात : महाराष्ट्र प्रदेश भाजपकडून केंद्रीय नेतृत्वाला प्रस्ताव.

* राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टातील सुनावणी 3 आठवडे लांबणीवर*

* संबंधित विभागांशी चर्चा विनिमय करण्यासाठी, उत्तर दाखल करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अजून 2 आठवड्यांचा वेळ मागितला.

* वारंवार मुदतवाढीबद्दल नाराजी व्यक्त करत कोर्टाने सुनावणी 3 आठवड्यांनी ठेवली.

* कर्नाटकात काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यास बेरोजगार पदवीधरांना ३००० आणि डिप्लोमाधारकांना १५०० रुपये बेरोजगार भत्ता देऊ, अशी महत्त्वाची घोषणा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली.

* रणवीर सिंग हा ब्रॅंड गुंतवणूकीसाठी २०२२ वर्षातील देशातील सर्वात महत्त्वाचा सेलीब्रेटी ठरला आहे. त्याने विराट कोहलीला मागे टाकले आहे. 

* रणवीरची ब्रॅंड व्हॅल्यू ही १८१.७ मिलीयन डॉलर एवढी असून विराटची हीच व्हॅल्यू १७९.६ मिलीयन डॉलर एवढी आहे. सलग दोन वर्ष विराटची ब्रॅंड व्हॅल्यू घसरली आहे. खासकरुन विराटने कॅप्टनी सोडल्यावर मोठा परिणाम पाहायला मिळाला. 

* विराटची ब्रॅंड व्हॅल्यू २०२०मध्ये २३७.७ मिलीयन डॉलर होती. तर २०२१मध्ये हीच व्हॅल्यू १८५.७ मिलीयन डॉलर झाली.

* सध्या रणवीर सिंगबरोबर ४० ब्रॅंड्स काम करत आहेत. त्यात NBA, Yas Islandसारख्या आंतरराष्ट्रीय ब्रॅंड्सचाही समावेश आहे. तो पेप्सीकोचाही सध्या ब्रॅंड ॲबेसिडर आहे. 

* अक्षय कुमार तिसऱ्या स्थानावर कायम असून त्याची ब्रॅंड व्हल्यू १५३.६ मिलीयन डॉलर एवढी आहे तर आलिया भट चौथ्या स्थानावर असून तीची ब्रॅंड व्हॅल्यू १०२.९ मिलीयन डॉलर आहे. पाचव्या स्थानावर दिपीका पदुकोन असून तिची ब्रॅंड व्हॅल्यू ८२.९ मिलीयन डॉलर एवढी आहे.

* प्रधानमंत्री आवास योजना: राज्यात आतापर्यंत 99 लाख 3 हजार 791 घरकुले पूर्ण, उर्वरित 2055 घरकुलांची मंजुरीची प्रक्रिया सुरु - ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन  

* धाराशिव येथे ‘टेक्निकल टेक्सटाईल पार्क’ उभारण्याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत समिती गठित, समितीचा अहवाल 30 दिवसात मागविण्यात येणार 

* 'जेव्हा जे व्हायचे असेल तेव्हा ते होईल': लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमानच्या ऑफिस मेलवर मेल करुन त्याला जीवे मारण्याची दिली होती धमकी, त्यावर सलमानचे स्पष्टीकरण - 'जेव्हा जे व्हायचे असेल तेव्हा ते होईल'

* बीड जिल्ह्यात अनेक गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत कामे सुरू, जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशनच्या कामांमधील अनियमिततेबाबत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश 

* महाराष्ट्रातील भूकंप: चंद्रपुरातील गोंडपिंपरी तालुका व गडचिरोलीतील अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) येथे भूकंपाचे धक्के, भूकंपाची तीव्रता 3.1 रिश्टर स्केल 

* शेअर बाजार:  सेन्सेक्स 445 अंकांनी वधारून 58,074.68 वर तर निफ्टी 119 अंकांनी वाढून 17,107.50 वर बंद.

 ✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या