🌟महाराष्ट्रात आजवर सादर झालेला सर्वात शानदार,दमदार अर्थसंकल्प...!


🌟भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंदराव भरोसे यांचे प्रतिपादन🌟

राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात सर्वसामान्यांना आधार देणारा,सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी नुकताच सादर केला आहे.


या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने काल परभणी येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. पत्रकार परिषदेला प्रदेश प्रवक्ते श्री.उमेश जी देशमुख,परभणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष श्री.आनंदराव भरोसे,ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाषराव कदम,भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री.संजयराव शेळके,संघटन सरचिटणीस अँड. एन.डी.देशमुख,माजी जिल्हाध्यक्ष प्रा.पि.डी. पाटील,मानवत तालुकाध्यक्ष श्री.शिवराज नाईक,किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.उध्दवराव नाईक उपस्थित होते.

मा.देवेंद्रजी फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा ग्रामीण महाराष्ट्र, शेतकरी - कष्टकरी, महिला, विद्यार्थी यांच्यासह सर्व समाज घटकांना न्याय देणारा आहे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या