🌟पुर्णेतील सार्वजनिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व भगवान बुद्ध जयंती मंडळ कार्यकारीणीची निवड जाहीर....!


🌟अध्यक्ष पदावर पूज्य भदंत पंय्यावंश तर कार्याध्यक्ष पदावर रिपाईचे जेष्ठ नेते प्रकाश कांबळे यांची निवड🌟

पूर्णा : महामानव भारतत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या सार्वजनिक जयंतीच्या निमित्ताने पूज्य भदंत डॉ. उपगुप्तजी महाथरो यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्रीकांत हिवाळे यांच्या अध्यक्षतेखाली येथील बुद्ध विहार येथे नुकतीच एक बैठक संपन्न झाली या बैठकीत सर्वानुमते सार्वजनिक भिम व भगवान बुध्द जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्ष पदावर पूज्य भदंत पंय्यावंश यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर कार्याध्यक्ष पदावर रिपाईचे जेष्ठ नेते प्रकाश कांबळे यांची निवड करण्यात आली.तर सरचिटणीस पदावर गटनेते उत्तम खंदारे यांची निवड करण्यात आली. उर्वरीत कार्यकारीणी खालील प्रमाणे....

         उपाध्यक्ष मा.श्रीकांत हिवाळे,मोहन लोखंडे,साहेबराव सोनवणे,रवि गायकवाड,विशाल कांबळे.सहचिटणीस पदावर भिमा वाहुळे,सुबोध सोनकांबळे कोषाध्यक्ष पदावर राहुल धबाले,सह  कोषाध्यक्ष म्हणून गौतम भोळे यांची निवड करण्यात आली. स्वागताध्यक्ष पदावर मोहनराव मोरे यांची निवड करण्यात आली.संघटक म्हणून ॲड.हर्षवर्धन गायकवाड, ॲड.धम्मा जोंधळे,अशोक व्ही.कांबळे,अनिल खर्ग खराटे,दादाराव पंडित,मधुकर गायकवाड, वीरेश कसबे,प्राचार्य केशव जोंधळे,राजकुमार सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली तर हिशोब तपासनीस म्हणून पि.जी.रणवीर व लक्ष्मीकांत शिंदे यांना निवडण्यात आले.

कार्यकारी सदस्य म्हणून दिलीप गायकवाड,मुकुंद पाटील,शाहीर गौतम कांबळे,यादवराव भवरे,आनंद गायकवाड,सिध्दार्थ भालेराव,मिलिंद सोनकांबळे,सुनील जाधव,नागेश येगडे, गौतम काळेभारत जोंधळे,राजू बोदक यांची निवड करण्यात आली.तर सल्लागार म्हणून अमृत मोरे,शिवाजी थोरात,त्रिंबक कांबळे,बळीराम खारे,रमेश बरकुंटे,वा.रा.काळे,गंगाधर कांबळे,विजयकुमार जोंधळे,गंगाधर खरे आदिंची निवड करण्यात आली.

      डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजात रुजविण्यासाठी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याचा नवनिर्वाचित मंडळाने संकल्प केला आंबेडकर जयंती निमित्त शहरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात येण्याचा मनोदय मंडळाने व्यक्त केला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या