🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/बातम्या.....!🌟देशात हुकूमशाहीचं सरकार, न्यायाधीशांना धमक्या देण्याचं काम सुरु : संजय राऊत 

 ✍️ मोहन चौकेकर

* एकनाथ शिंदेंचा खेडच्या सभेतून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल : सत्तेसाठी पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला.

* राहुल गांधींना पोलिसांच्या नोटीसीनंतर काँग्रेसच ट्वीट चर्चेत.

* दिल्ली पोलीस थेट राहुल गांधींच्या घरी पोहोचले ; भारत जोडो यात्रेतील 'त्या' वक्तव्याप्रकरणी धाडलेली नोटीस, देशात हुकूमशाहीचं सरकार, न्यायाधीशांना धमक्या देण्याचं काम सुरु : संजय राऊत 

* राज्यात अवकाळीचा कहर,उभी पिकं जमीनदोस्त; बळीराजा संकटात,अवकाळीमुळे मराठवाड्यात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू, 62 हजार 480 हेक्टर पिकांचे नुकसान.

* राष्ट्रवादी काॅग्रेस व ठाकरे गटाचे १३-१४ आमदार आमच्याकडे येणार -- मंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा.

* राज्यात आणखी तिघांचा फ्लूने मृत्यू, मृतांची एकूण संख्या ७ वर; ठाण्यात करोनाचा एक बळी.

* पंडीत नेहरुंनी देशासाठी कोणतंच काम केलं नाही, जातीपातीमुळे महाराष्ट्र विकासात मागे : चंद्रकांत पाटील

* नाशिकच्या येवल्यामधील २९ वर्षीय जवानाला वीरमरण, राजस्थानमध्ये घडली दुर्दैवी घटना

* अदानींचे स्वप्न भंगले, हिंडेनबर्गने गौतम अदानींना दिला मोठा धक्का, ३४,९०० कोटींचा प्रकल्प थांबवावा लागला

* 'अगली बार बडा झटका देंगे, मॅटर क्लोज करना है...'; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी 

* उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी तोडावी, आजही नेतृत्व मान्य करु : दीपक केसरकर

* छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल हिंदू समाजाचा विराट मोर्चा; हजारोच्या संख्येने लोक एकत्र.

* पोलिसांना पुढे करून राहुल गांधींचा आवाज दडपण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रयत्न यशस्वी होणार नाही : नाना पटोले

* '45 दिवस पोलीस झोपले होते का..?' राहुल गांधींच्या चौकशीवरुन काँग्रस नेत्यांचा भाजपवर घणाघाताचा आरोप.

* 19 वर्षाच्या मुलीनं 15 वर्षाच्या मुलावर केला होता बलात्कार, इंदूर कोर्टनं सुनावली शिक्षा. 

* एसटीच्याही एक पाऊल पुढे लातूर सिटी बस, महिलांसाठी वर्षभरापासून मोफत प्रवास, २५ लाख महिलांना लाभ

* श्री.अंबाबाई मंदिर परिसरात आवश्यक त्या सोयी-सुविधा देणार - पालकमंत्री दीपक केसरकर

* आंतरराष्ट्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग परिषदेच्या पर्वाला आजपासून नवी दिल्लीमध्ये सुरुवात होणार.

* बहुराज्यीय सहकारी तत्वं अंगीकारल्यामुळे कृषी उत्पादन निर्यातीला प्रोत्साहन मिळेल - अमित शहा

* मियामी ओपन स्पर्धेतून नोवाक जोकोविचची माघार, कोरोना लस न घेतल्यामुळे अमेरिकेत प्रवेशबंदी.

* एस्ट्रोलॉजर Jyoti Arora ने जिंकला Mrs India 2023 चा किताब; आंतरराष्ट्रीय स्तरावर करणार भारताचे प्रतिनिधित्व.

* बुलढाणा जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस.

* महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा फटका ; जालना, बीडमध्ये तुफान गारपीट, दरम्यान, 20 मार्चपर्यंत राज्यात पावसाचा अंदाज.

* पूर्वोत्तर राज्यांमधील पर्यटन करण्यासाठी भारत गौरव ट्रेन सुरू, 21 मार्च रोजी हि ट्रेन दिल्लीतील सफदरगंज स्थानकावरून निघणार.

* महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (MH SET) 2023 चे प्रवेशपत्र जारी, परीक्षा 26 मार्च 2023 रोजी दोन सत्रात घेतली जाणार.

* पुन्हा एकदा कर्मचारी कपात! आयटी कंपनी विप्रोने 120 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले, ही कपात झाली केवळ एका विशिष्ट क्षेत्रात.

* शुक्र ग्रहावर शास्त्रज्ञांना आढळला ज्वालामुखी, नासाच्या मॅगेलन अंतराळयानाने शुक्रावरील ज्वालामुखीचे पाठवले फोटो.

* ऑस्ट्रेलियाने भारताचा 10 गडी राखून केला पराभव, 118 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कांगारुने अवघ्या 11 षटकात जिंकला सामना.

* सोन्याचे आजचे दर : मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचे प्रती 10 ग्रॅमसाठीचे दर 60320 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचे प्रती 10 ग्रॅमसाठीचे दर 55300 रुपये.

* ताजिकिस्तानमध्ये 4.4 तीव्रतेचा भूकंप, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती; याआधी येथे 6.7 तीव्रतेचा झाला होता भूकंप.

* बांगलादेशच्या दक्षिण मदारीपूर येथे प्रवासी बस दरीत कोसळून भीषण अपघात, भीषण अपघातात 19 जणांचा मृत्यू तर 26 प्रवासी जखमी.

*  'तू झुठी मैं मक्कार' 100 कोटींच्या क्लबमध्ये, अभिनेता रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचा कॉमेडी-रोमँटिक चित्रपट 'तू झुठी मैं मक्कार' बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई,

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या