🌟परभणीचे शिवसेना खा.संजय (बंडू )जाधव यांना 'वाय' प्लस सुरक्षा देण्याची मागणी.....!


🌟शिवसेना परभणी उपजिल्हाप्रमुख दशरथ भोसले यांनी निवेदनाद्वारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे🌟


परभणी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय जाधव यांना मागे दोन वर्षांपूर्वी रींदा गॅंग पंजाब यांनी एक कोटी सुपारी दिली होती पण त्यावेळी संबंधित आरोपीची मुस्क्या आवलल्या होत्या, परभणी जिल्ह्यात एक साधा माळकरी वारकरी असणारा खासदार म्हणून संजय जाधव यांची पूर्ण जिल्हाभर ओळख आहे प्रत्येक गोरिबाच्या कामात मन लावून त्या माणसाचे काम करून देतात कोरोना काळात जिल्हाभर मदत केंद्र उभारून शिवसेनेच्या माध्यमातून जनतेची अहोरात्र सेवा केली या जिल्ह्यात अज्ञात आरोपीने नुकतीच जाधव साहेबांना जीवे मारण्यासाठी तीन कोटी ची रुपयांची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे एका लोकप्रतिनिधीला अशा प्रकारची जीवे मारण्याची धमकी येत असेल तर सामान्य जनतेने या शिंदे -फडणवीस सरकारकडून काय अपेक्षा कराव्यात या सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाहीत , शेतकरी त्रस्त आहेत त्यातच अशा एका लोकप्रिय खासदार संजय जाधव यांना सुपारी ची बातमी समोर आली त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना आक्रमक झाली आहे शिवसेना खासदार संजय बंडु जाधव यांना तात्काळ विना विलंब "Y"सुरक्षा देण्याची कारवाई वरिष्ठ पातळीवरून तात्काळ करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दशरथ भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मार्फत तहसीलदार पूर्णा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे

या निवेदनावर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दशरथ भोसले तालुकाप्रमुख काशिनाथ काळबांडे ,सह संपर्कप्रमुख सुधाकर दादा खराटे, शहरप्रमुख मुंजाभाऊ कदम नगराध्यक्ष संतोष एकलारे,माणिकराव सूर्यवंशी, नगरसेवक श्याम कदम, एडवोकेट राजू भालेराव, युवा सेना तालुकाप्रमुख बंडू आप्पा बनसोडे, युवा सेना शहर प्रमुख विकास वैजवाडे,  जिल्हा परिषद सदस्य कोंडीबा सोनटक्के, सर्कल प्रमुख बालाजी पिसाळ, रमेश ठाकूर, बालाजी वैद्य, माणिकराव सूर्यवंशी सुभाष, भोसले,बालाजी भोसले गजानन सवराते, शंकर गलांडे, यांच्यासह तालुक्यातील असंख्य शिवसैनिक उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या