🌟परभणीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान...!


🌟विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्‍या 15 महिलांना स्व.सुषमाताई स्वराज स्मृतीचिन्हाने गौरव करण्यात आला🌟

परभणी (दि.11 मार्च) : भारतीय जनता पक्षाच्या महानगर महिला मोर्चाच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधत विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्‍या 15 महिलांना स्व. सुषमाताई स्वराज स्मृतीचिन्हाने गौरव करण्यात आला.

          ज्येष्ठ पत्रकार श्रीमती हेमा रसाळ, ज्येष्ठ  साहित्यिका सौ. सरोज देशपांडे, रुकसार शेख, ज्योती कडे, छाया गायकवाड, ज्योती पाठक, लोचना देशमुख, अंजली गायकवाड, विद्या रेंगे, द्रौपदी सोंगे अनुसया वाहुळे या महिलांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मोहन कुलकर्णी, संजय शेळके, राजेश देशपांडे, संघटन सरचिटणीस अ‍ॅड. एन. डी. देशमुख, परभणी महानगर प्रभारी सौ.संध्या राठोड, महिला जिल्हाध्यक्षा सुप्रियाताई कुलकर्णी, भाजपा उपाध्यक्षा सौ. डॉ. मीना परताणी, मंडळाध्यक्ष सौ. मंगल मुदगलकर, पुष्पा मुंडे, छाया मोगले प्रभावती अन्नपूर्वे, सरचिटणीस संजय रिजवानी, उपाध्यक्ष कमलकिशोर अग्रवाल, प्रशांत सांगळे, संतोष जाधव, पुनम शर्मा, प्रियंका खडके, पौर्णिमा लोकरे, दिपाली चांदस्कर सुप्रिया मांडे, सीमा भालेराव, सुशीला डहाळे, रोहिणी हालगे, रमा शेजावळे आदी भाजपा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजयाताई कातकडे तर प्रास्ताविक सुप्रिया कुलकर्णी आणि आभार प्रदर्शन शकुंतला मठपती यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या