🌟पुर्णा रेल्वे स्थानक क्रमांक चारवर उसळला आगडोंब अन् अपवांना फुटले पेव....!


🌟अधिकारी/कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष जागृक नागरिकांनी लक्ष वेधताच तात्काळ विझवली आग : पुढील अनर्थ टळला🌟


पुर्णा (दि.१२ मार्च) - पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाश्यांसह रेल्वे स्थानकावर कार्यरत कँन्टींग चालक रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न सातत्याने गंभीर होतांना दिसत असून अपुऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांमुळे केव्हा काय होईल हे सांगता येत नाही पुर्णा जंक्शन स्थानकावर चार प्लॉटफाम असून या स्थानकांवरुन चोवीस तासाच्या कालावधीत तब्बल ४० प्रवासी रेल्वे गाड्या तर ३० माल वाहतूक करणाऱ्या मालगाड्या धावतात परंतु निव्वल असुन नसल्यागत अत्यंत तोकड्या दोन रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी व दोन लोहमार्ग पोलिस या दोन कर्मचाऱ्यांतील एक कर्मचारी सुध्दा गांजा तस्करी प्रकरणात हिंगोली पोलिस दलाकडून अटक ज्यांच्या भरावश्यावर रेल्वे संपत्तीसह रेल्वे प्रवासी वर्गाची सुरक्षा अवलंबून असते त्यांचीच संख्या कमकुवत असल्याने चार रेल्वे स्थानक व करोडो रुपयांच्या रेल्वे संपत्तीसह प्रवासी वर्गाच्या व विशेष करून महिला प्रवाश्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येणार नाही तर काय ? 


पुर्णा शहरासह संपूर्ण तालुक्याला अती संवेदनशिलतेचा कलंक लागलेला त्यामुळे एखादी किरकोळ घटना जरी घडली तरी पाहता पाहता सर्वत्र अफवांना पेव फुटते असाच एक प्रकार दि.१० मार्च २०२३ रोजी रात्री ०९-०० ते ०९-३० वाजेच्या सुमारास पुर्णा रेल्वे स्थानक क्रमांक ४ जवळील प्रवासी वेटींग हॉल लगत घडला या ठिकाणी अचानक मोठ्ठा आगडोंब उसळल्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली यावेळी सदरील घटने संदर्भात रेल्वे स्टेशन मास्तरसह अन्य अधिकारी/कर्मचारी देखील गाफील राहिल्यामुळे काही प्रत्यक्षदर्षी जवाबदार नागरिकांनी सदरील बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना घटना स्थळावर जाण्यास सांगितले यावेळी घटनासस्थळावर आलेल्या कर्मचाऱ्यांनी इकडून तिकडून पाण्याचा बंदोबस्त करुन आग विझवली खरी परंतु सदरील आग लागली कशी या बाबत चौकशी केल्यानंतर असे निदर्शनास आले की रेल्वे स्थानकासह परिसरातील कचरा एकत्रित करून स्वच्छता कर्मचाऱ्यांनीच बेजवाबदारपणे त्या कचऱ्याला आग लावल्यामुळे मोठ्ठा आगडोंब उसळला परंतु वेळीच आग विझवल्यामुळे अनर्थ टळला असला तरी असा गंभीर प्रकार घडत असतांना याकडे कोणीही लक्ष दिले नाही ही बाब निश्चितच गंभीर व लज्जास्पद म्हणावी लागेल.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या