🌟पुर्णा तालुक्यातील माखणी येथे सावित्राबाई फुले जयंतीनिमित्त संयुक्त महिला हक्क प्रशिक्षण संपन्न....!


🌟यावेळी शेंद्रिय शेतीतील लागणारे औषधी कशी तयार करावी याचे देखील प्रशिक्षण महिलांना देण्यात आले🌟

पूर्णा प्रतिनिधी

पूर्णा तालुक्यातील माखणी या गावात सावित्रीबाई फुले जयंती निमित्त संयुक्त महिला हक्क प्रशिक्षण घेण्यात आले यामध्ये महीला आर्थिक विकास महामंडळ  यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती अर्चना जगाडे  (सऱ्योगिनी) बचत गट या कार्यक्रमात महिलांची मनोगती घेण्यात आली त्यात. मिरा अवरगंड . राधा पुरी आदींनी मनोगत व्यक्त केले महिला बचत गट, हरिओम महिला बचत गट,रमाई महिला बचत गट.बळीराजा स्वयंसहायता समूह, श्रीदत्त महिला आर्थिक विकास महामंडळ या बचत गटातील महिलांना आपला मालकी हक्क शेंद्रीय शेती मध्ये लागणारे साहित्य व त्या मध्ये शेंद्रिय शेतीतील लागणारे औषधी कशी तयार करावी याचे देखील प्रशिक्षण देण्यात आले या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती.

महानंदा भोसले. राधा पुरी. शिवणांदा पुरी. प्रयाग अवरगंड. मिरा अवरगंड. सरस्वती अवरगंड. येनुबई सुर्यवंशी. मथुराबई अवरगंड मनीषा सुर्यवंशी. छाया अवरगंड. पार्वती अवरगंड. संताबई अवरगंड आदी महिलांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना जगाडे यांनी केले तर प्रास्ताविक सरस्वती अवरगंड तर आभार प्रदर्शन मिरा अवरगंड यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या