🌟नाथ शिक्षण संस्था संचलित शारदा विद्या मंदिर व मिलिंद विद्यालयाचा विद्यार्थी बनला पोलीस उपनिरीक्षक....!


🌟गोपाळ बदने यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड ; नाथ शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार🌟

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगा तर्फे घेण्यात येणा-या पोलीस उपनिरीक्षकच्या परीक्षेत परळी तालुक्यातील चांदापूर  येथील गोपाळ बदने यांची निवड झाल्याबद्दल नाथ शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

        महाराष्ट्र लोकसेवा आयोगा तर्फे घेण्यात येणा-या पोलीस उपनिरीक्षकच्या परीक्षेत नाथ शिक्षण संस्था संचलित शारदा विद्या मंदिर व मिलिंद विद्यालयांचा विद्यार्थी गोपाळ बदने यांनी घवघावीत यश मिळवले आहे. परळी तालुक्यातील चांदापूर सारख्या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातून अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी हे यश संपादन केले. या यशाबद्दल नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व परळी विधानसभा मतदार संघाचे भाग्यविधाते आ. धनंजय मुंडे यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच नाथ शिक्षण संस्थेच्या मार्गदर्शीका रुक्मिणबाई मुंडे यांच्या हस्ते पुष्पगुछ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

          जिद्द आणि चिकाटीने वाटचाल केली की आकाशालाही गवसणी घालता येते. तसेच आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी घेतलेल्या कष्टाची जाण ठेवली तर मिळणारे यश हे आयुष्याचा सोहळा करणारे ठरते. प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून ग्रामीण भागातील विद्यार्थीयानी मिळवलेले यश अभिमानास्पद आहे. असे प्रतिपादन नाथ शिक्षण संस्थेच्या मार्गदर्शीक रुक्मिणबाई मुंडे यांनी केले.या यशामध्ये नाथ शिक्षण संस्था संचलीत शारदा विद्या मंदिर व मिलिंद विद्यालयाचा मोलाचा वाटा होता. तसेच माझे वडील व आई यांच्या आशीर्वादाने व मित्र मंडळी यांचे सुद्धा सहकार्य मुळे या यशा पर्यंत पोहचू शकलो असे उद्गार श्री गोपाळ बदने यांनी काढले. 

       यावेळी नाथरा गावचे सरपंच अभय मुंडे, नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे, प्राचार्य अतुल दुबे सर, सरपंच संग्राम गित्ते, सुरेश मुंडे, मुख्याध्यापक अंबादास लोणिकर, प्रा.किरण शिंदे, कवडे सर, आघाव सर, फड सर उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या