🌟पुर्णेतील श्री गुरू बुद्धीस्वामी महाविद्यालया 'तत्वज्ञानाचे मानवी जीवनात महत्व' या विषयावर व्याख्यान संपन्न.....!


🌟जीवनात यशस्वी होण्यासाठी विचारांची सकारात्मकता आवश्यक - डॉ.प्रभाकर किर्तनकार

 पूर्णा (दि.१६ मार्च) येथील श्री गुरू बुद्धीस्वामी महाविद्यालयाच्या तत्वज्ञान विभाग तसेच अन्तर्गत गुणवत्ता हमीकक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना “तत्वज्ञानाचे मानवी जीवनात महत्व “ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्राचार्य डॉ के राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून स्वातंत्रसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयातील डॉ प्रभाकर कीर्तनकार तसेच उपप्राचार्य डॉक्टर संजय दळवी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

 या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना डॉक्टर प्रभाकर कीर्तनकार यांनी विचारांची सकारात्मकता तसेच नैतिक दृष्टिकोन जीवनाच्या यशस्वीतेचा पाया आहे असे स्पष्ट केले. डॉक्टर संजय दळवी यांनी विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांचा कसा संबंध आहे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनात सांगितले. तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉक्टर आंबटकर यांनी मानवी जीवन आणि तत्त्वज्ञान यांची सांगड जीवनात कशी घातली पाहिजेत यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कालिदास वैद्य यांनी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या