🌟कैकाडी समाजाची आन-बान शान पाथर्डी तालुक्यातील मडी येथील चैतन्य कानिफनाथ देवस्थान....!


🌟चलो मढी...चलो मढी...

कैकाडी समाजाची आन-बान शान म्हणजे चैतन्य कानिफनाथ देवस्थान. कैकड्याच्या काठीचा पहिला मान असतो. कैकाडीची काठी चैतन्य कानिफनाथ समाधी व मंदिराच्या लागल्यानंतर कानिफनाथ यात्रा सुरू होते कानिफनाथ यात्रा पौर्णिमा ते अमोशा पर्यंत असते. मडीला भटक्याची पंढरी असे म्हणतात.


यावेळी ही आपली ध्वज पताका काठी ही पारंपारिक रितीरिवाजानुसार निघणार आहे यावर्षी पौर्णिमेच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच दिनांक पाच तीन 2003 रोजी सायंकाळी सात ते बारा वाजेपर्यंत पाथर्डी येथे ढोल ताशाच्या गजरात व डफच्या तालावर मिरवणूक निघते.त्यानंतर होळीच्या दिवशी म्हणजे यावर्षी सहा तीन 2023 रोजी सकाळी दहा वाजता मिरवणुकी मढी येथून कानिफनाथ गडाच्या पायथ्यापासून पारंपारिक पारापासून सुरू होऊन सुमारे अकरा वाजता पैठण दरवाजातून घुसून कानिफनाथ महाराजांच्या समाधीची तसेच कळसाची भेट घेते. तसेच रंगपंचमीच्या दिवशी सुद्धा मढी येथून मिरवणूक निघते त्याप्रमाणे कार्यक्रम आहेत.

आपण सर्व कैकाडी समाज बांधव भगिनी सगेसोयरे मित्र परिवारास दि.06 मार्च 2023 रोजी मढी येथे सकाळी ठिक 10-00 वाजता कानिफनाथ गडाच्या पायथ्याशी उपस्थित राहायचे असून तिथूनच मिरवणूक सुरू होणार आहे यावेळी हजोरोच्या संख्येने सर्व समाज बांधवांनी मिरवणूकीत सहभागी व्हायचे आहे कानिफनाथ देवस्थान हे कैकाडी समाजाचे अस्तित्व दाखवते सदरची कैकाडी अस्मिता जपण्यासाठी आपण सहपरिवार उपस्थित राहावे तसेच आपल्या मित्रपरिवार यांना उपस्थित राहण्यास सांगावे गेल्या सातचे वर्षापासून हा उत्सव मानकरांच्या वर्गणीतून चालू आहे सर्व मानकरी मिळून वर्गणी गोळा करतात व त्यातून हा उत्सव होतो गेल्या दोन वर्षापासून काही दानशूर मंडळी देणगी देतात त्याही स्वीकारल्या जातात तरी सर्व कैकाडी समाज बांधवांनी या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन चैतन्य कानिफनाथ कैकाडी समाज मानकरी मंडळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सुखदेव बन्सी जाधव,सचिव सुनील लक्ष्मण जाधव नांदेड,उपाध्यक्ष सुनील लक्ष्मण जाधव मढी तालुका पाथर्डी मुक्काम अहमदनगर,सहसचिव श्रीराम दशरथ जाधव राहणार शिक्रापूर जिल्हा पुणे व सर्व मानकरी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे....

    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या