🌟प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिला आघाडी पदाधिकाऱ्यांची नियुक्त्या जाहीर.....!


🌟यात सौ.मनीषाताई रेंगे व सौ.सोनालीताई गुठे यांच्या परभणी शहर विभाग प्रमुख म्हणून नियुक्त्या जाहीर🌟

परभणी - प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हा कार्यकारणीची बैठक जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या अध्यक्षते खाली जिल्हा संपर्क कार्यालयात घेण्यात आली या बैठकीत महिला आघाडी पदाधिकाऱ्यांच्या शहरातील  नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून शहरातील महिला विभाग प्रमुखांच्या नियुक्त्या आज जाहीर करण्यात आल्या यात सौ.मनीषाताई रेंगे व सौ.सोनालीताई गुठे यांच्या परभणी शहर विभाग प्रमुख म्हणून नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून नियुक्तीचे पत्र प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ.माधवीताई घोडके पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.

या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, महिला आघाडी शहर चिटणीस ॲड. सुवर्णाताई देशमुख, उपशहर प्रमुख सौ.सुषमाताई देशपांडे, मिडिया प्रभारी नकुल होगे, पिंटू कदम, उध्दव गरुड, शेख बशीर आदींची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या