🌟अनाथ बालकांना तत्काळ प्रमाणपत्र वितरित करावे तसेच दिरंगाई प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करा.....!


🌟प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हाधिकारी यांच्या कडे मागणी🌟

महाराष्ट्र राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या दि.२३.०८.२०२१ च्या शासन निर्णयानुसार संस्थेतील अनाथ बालकांना 'अ' व 'ब' प्रवर्गात तसेच संस्था बाह्य अनाथ बालकांना 'क' प्रवर्गात अनाथ प्रमाणपत्र देणे बाबत सुचित करण्यात आले आहे असे असताना ही परभणी जिल्ह्यात संस्था बाह्य बालकांचे म्हणजेच 'क' प्रवर्गातील प्रस्ताव हे प्राधान्याने शिफारशीसह जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडून विभागीय आयुक्तांना पाठविण्यात येत आहेत. परंतु संस्थेतील अ' व 'ब' प्रवर्गातील बालकांचे प्रस्ताव प्राधान्याने शिफारशीसह पाठविणे क्रमप्राप्त असतानाही अ' व 'ब' प्रवर्गातील अनाथ बालकांचे शिफारशीसह प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात जिल्हा व महिला बालविकास अधिकारी कार्यालयाकडून दुर्लक्ष होत असल्याबाबतची तक्रार अ' व 'ब' प्रवर्गातील अनाथ मुलांनी लेखी स्वरुपात प्रहार जनशक्ती पक्षाकडे केली आहे. या निवेदनाची तत्काळ दखल घेत प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या शिष्ट मंडळासह निवासी उजिल्हाधिकारी श्री. महेश वडदकर यांची भेट घेऊन या विषयावर तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

'क' प्रवर्गातील बालकांचे अनाथ प्रमाणपत्रा बाबत तत्काळ निर्णय घेणारे परभणी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय प्रवर्ग अ' व 'ब' बाबत दिरंगाई करतांना दिसत आहे. प्रवर्ग 'अ' व 'ब' चे अनेक प्रस्ताव नोव्हेंबर - २०२१ पासून संबंधित संस्था व महिला व बालविकास कार्यालय परभणी यांच्याकडून विभागीय उपआयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आलेले नाहीत हि एक गंभीर बाब आहे. वेळेवर अनाथ बालकांचे प्रमाणपत्र न मिळाल्याने पुढील शिक्षण व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनाथांच्या आरक्षण लाभा पासून वंचित राहावे लागेल हा अनाथांवर एक प्रकारचा अन्यायच आहे.

 बाल न्याय अधिनियम कलम ७४ नुसार अनाथ मुलांचे नाव जाहीर करता येत नसल्याने तक्रारदारांची नावे प्रहार जनशक्ती पक्षाच्या निवेदनात नमूद करण्यात आली नाही तरी जिल्हाधिकारी यांनी या बाबत स्वतः पुढाकार घेवून परभणी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय प्रमुखांची तसेच अनाथ मुले शिक्षण घेत असलेल्या संस्था चालकांची संयुक्त बैठक घेवून संस्थात्मक 'अ' व 'ब' प्रवर्गातील बालकांचे अनाथ प्रमाणपत्राचे प्रस्ताव तात्काळ विभागीय उपआयुक्त औरंगाबाद यांच्याकडे योग्य शिफारशीसह पाठविण्या बाबत सुचना द्याव्यात. तसेच या प्रकरणात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कार्यवाही बाबत शासनाकडे शिफारस करावी असे ही या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, शहर प्रमुख धर्मेंद्र तूपसमुद्रे, शहर चिटणीस वैभव संघई, मिडिया प्रभारी नकुल होगे, पिंटू कदम, रामेश्वर पुरी, शेख वशीर, बालाजी नरवाडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या